आता आम्ही निर्णय घेण्यास मोकळे! अपना दल भाजपाची साथ सोडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 08:17 AM2019-02-22T08:17:57+5:302019-02-22T08:22:18+5:30
एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे.
लखनौ - एकीकडे लोकसभा निवडणुकांपूर्वी मित्रपक्षांना जोडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे भाजपाचा एनडीएमधील एक साथीदार भाजपाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपासोबत आघाडी असलेल्या अपना दलच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनी एनडीए सोडण्याचा इशारा दिला आहे.
अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, ''भाजपाला आपल्या मित्रपक्षांना सांभाळून घेता येत नाही. अपना दलने भाजपाला 20 फेब्रुवारीपर्यंत आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यास सांगितले होते. मात्र भाजपाने आमच्या तक्रारींचे निवारण केलेले नाही. त्यामुळे आता अपना दल आपला निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे. आता 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत आम्ही पुढील निर्णय घेऊ.''
Union Minister & Apna Dal chief Anupriya Patel: BJP ke saath hamein kuch samasyaein aayi aur usko humne sheersh netritiva ke saamne rakha bhi aur 20 February tak humne unhe samay diya ki in samasyaon ka samadhaan kare. Lekin unhone inn samasyaon ka samadhaan nahi kiya. (21.02) pic.twitter.com/cIQcN5q3e6
— ANI UP (@ANINewsUP) February 21, 2019
मात्र अनुप्रिया पटेल यांनी भाजपाने दिलेली आश्वासने आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर टिप्पणी करण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हा मुद्दा बनेल का असे विचारले असता अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, मला वाटत नाही की राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा बनेल. तसेच आगामी निवडणुकीत कुणाचे तिकीट कापायचे आणि कुणाला उमेदवारी द्यायची हा पूर्णपणे भाजपाचा अंतर्गत निर्णय असेल.''
Apna Dal convener and minister of state in Modi cabinet Anupriya Patel said that her party will now be free to choose its own path as the BJP leadership was not showing any interest in resolving her party’s issues
— ANI Digital (@ani_digital) February 21, 2019
Read @ANI story | https://t.co/wRLskxvxkLpic.twitter.com/1mwUDoSgQ1
उत्तर प्रदेशमध्ये अपना दल हा भाजपाचा सहकारी पक्ष आहे. केंद्रामध्ये अपना दलच्या कोट्यातून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारमध्येही अपना दलचा एक मंत्री आहे. गेल्या काही काळापासून अपना दल भाजपावर नाराज आहे. यावेळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. 2014 मध्ये अपना दलने दोन जागांवर निवडणूक लढवली होती. तसेच दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला होता.