आता पीएफ काढता येणार ऑनलाइन

By admin | Published: February 14, 2017 06:14 AM2017-02-14T06:14:02+5:302017-02-14T06:14:02+5:30

कर्मचारी भविष्‍य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य ऑनलाइन पीएफ काढू शकतात.

Now we can get PF online | आता पीएफ काढता येणार ऑनलाइन

आता पीएफ काढता येणार ऑनलाइन

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - कर्मचारी भविष्‍य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य एप्रिल महिन्यापासून ऑनलाइन पीएफ काढू शकतात. यासाठी स्वतःच्या कंपनीत किंवा कार्यालयात पैसे काढण्याचा फॉर्म भरण्याची गरज नाही. यामुळे ईपीएफओच्या जवळपास 17 कोटी सदस्यांना फायदा होणार आहे. 
 
ईपीएफओ ऑनलाइन पीएफ काढण्यावर काम करत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी  ईपीएफओच्या कार्यालयांना सॉफ्टवेअरद्वारे जोडण्याचं काम सुरू आहे.  मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होऊन एप्रिलपासून ऑनलाइन पीएफ काढण्यास सुरूवात होण्याची शक्यता आहे. 
 
ही सेवा सुरू झाल्यावर ईपीएफओच्या वेबसाईटवर जाऊन  पीएफ काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.  सध्या पीएफ काढण्यासाठी पैसे काढण्याचा फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर तो कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटकडे जमा करावा लागतो. नंतर तो फॉर्म ईपीएफओ कार्यालयात जातो, या प्रक्रियेला बराच वेळ लागतो, मात्र ऑनलाइऩ सेवा सुरू झाल्यास त्वरित पीएफ काढता येऊ शकतो. 
 

Web Title: Now we can get PF online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.