आता पेट्रोल पंपांची साप्ताहिक सुट्टी, दर रविवारी राहणार बंद?
By admin | Published: April 10, 2017 05:51 PM2017-04-10T17:51:30+5:302017-04-10T18:07:30+5:30
पेट्रोल पंप मालकांनी 10 मे नंतर प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची धमकी दिली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पेट्रोल पंप मालकांनी 10 मे नंतर प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची धमकी दिली आहे. केंद्र सरकारकडून कमिशन वाढवून दिले जात नसल्याने पेट्रोल पंप मालक नाराज आहेत, कमिशन वाढवून द्यावी या मागणीसाठी प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
सध्या पेट्रोल पंपांकडून आठवड्यात कधीही सुट्टी घेतली जात नाही, पण केंद्र सरकारकडून कमिशन वाढवून दिले जात नसल्याने 10 मे पासून दर रविवारी साप्ताहिक सुट्टी घेण्याचा इशारा देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. 10 मे रोजी पेट्रोलची खरेदी केली जाणार नाही, हा दिवस ‘नो पर्चेस डे’असेल अशी धमकी देशभरातील पेट्रोल पंप मालकांनी दिली असल्याचं हे वृत्त आहे. रविवारी हरियाणाच्या कुरूक्षेत्रमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापुर्वीही जानेवारी महिन्यात कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा पेट्रोल पंपांनी दिला होता. मात्र कमिशन वाढवून देण्याबद्दलचे आश्वासन केंद्राकडून देण्यात आल्यानंतर पेट्रोल पंप मालकांकडून संप मागे घेण्यात आला.
ठळक मुद्दे-
-कमिशनमध्ये वाढ न केल्यास 10मे रोजी पेट्रोल आणि डिझेलची खरेदी केली जाणार नाही.
-10 मे नंतर येणा-या प्रत्येक रविवारी पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येईल आणि पेट्रोल पंप बंद राहणार.
-15 मे पासून पेट्रोल पंप रात्रीच्या वेळीही बंद राहणार.