आता पीरियड्स दिवशी महिलांना मिळणार सुटी, स्वातंत्र्यदिनी 'या' राज्याचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 03:45 PM2024-08-15T15:45:19+5:302024-08-15T15:50:14+5:30

आता ओडिशामध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून एक दिवसाची रजा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ही घोषणा केली.

Now women will get leave on period day big decision of odisha state on independence day | आता पीरियड्स दिवशी महिलांना मिळणार सुटी, स्वातंत्र्यदिनी 'या' राज्याचा मोठा निर्णय

आता पीरियड्स दिवशी महिलांना मिळणार सुटी, स्वातंत्र्यदिनी 'या' राज्याचा मोठा निर्णय

ओडिशा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून एक दिवसाची रजा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ही घोषणा केली. कटक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले की, आजपर्यंत महिलांना पीरियड्स काळात सुट्टी मिळत नाही. आता एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महिला मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ शकतील. ही रजा त्यांच्यासाठी ऐच्छिक असेल म्हणजेच त्यांना ती हवी असेल तरच मिळेल. हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी कंपन्यांनाही लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi : लाल किल्ल्यावरील कार्यक्रमात राखीव सीट सोडून राहुल गांधी मागच्या रांगेत जाऊन का बसले? संरक्षण मंत्रालयानं सांगितलं...

एका संशोधनानुसार,  ४० टक्के मुली पीरियड्स शाळेत जाऊ शकत नाहीत. शाळांमध्ये गोपनीयतेचा अभाव, शिक्षणाचा अभाव आणि जागरूकता यासारख्या गोष्टींमुळे त्यांना घरीच राहणे चांगले वाटते. सुमारे ६५ टक्के मुलींचे म्हणणे आहे की, पीरियड्समुळे त्यांच्या शालेय शिक्षणावर परिणाम होतो. त्यांना शाळा आणि वर्ग चुकवावे लागतात. अनेकवेळा ते लाजेमुळे जात नाहीत तर कधी त्यांची तब्येतही साथ देत नाही. ओडिशा सरकारच्या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्यांनीही कौतुक केले आहे.

अशा सुट्टीची मागणी असलेला एक अर्ज सर्वोच्च न्यायालयातही गेला होता, यावर न्यायालयाने विचार करण्यास नकार दिला होता. जपान, चीन, तैवान, कोरिया यांसारख्या देशांनी पीरियड्सबाबत धोरणे बनवली आहेत. भारतातही याची मागणी होत आहे. भारतातील कामगार कायद्यात मातृत्व लाभ कायदा आहे. त्याअंतर्गत याबाबत निर्णय घेण्याचे काम संस्थेवर सोडण्यात आले आहे. ओडिशाच्या आधी बिहार आणि केरळमध्ये रजेची तरतूद आहे. बिहारमध्ये दोन दिवस आणि केरळमध्ये तीन दिवसांची सुट्टी देण्याचा नियम आहे.

Web Title: Now women will get leave on period day big decision of odisha state on independence day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Odishaओदिशा