नौकेमध्ये बसून जाता येणार आता श्रीलंकेत; ४० वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 07:35 AM2023-10-15T07:35:19+5:302023-10-15T07:35:37+5:30
श्रीलंकेचे अध्यक्ष रानील विक्रमसिंघे म्हणाले की, यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार व सांस्कृतिक संपर्क सुधारेल.
नागपट्टिनम/नवी दिल्ली : श्रीलंकेतील गृहयुद्धामुळे बंद पडल्याच्या ४० वर्षांनंतर शनिवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील नौकासेवा पुन्हा सुरू झाली. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले.
श्रीलंकेचे अध्यक्ष रानील विक्रमसिंघे म्हणाले की, यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार व सांस्कृतिक संपर्क सुधारेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील नौकासेवेमुळे दोन्ही देशांमधील संपर्क वाढेल, व्यापाराला चालना मिळेल आणि संबंध दृढ होतील. (वृत्तसंस्था)
११० किमीचे अंतर, वेळ साडेतीन तास
ही हाय स्पीड नौका ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ चालवित आहे. तिची क्षमता १५० प्रवासी आहे. नागपट्टिनम-कांकेसंथुराईदरम्यानचे सुमारे ११० किमीचे अंतर सुमारे साडेतीन तासांत कापले जाईल.