आता एका दिवसातच अमरनाथचे दर्शन शक्य, श्रीनगरहून मिळणार थेट हेलिकाॅप्टर सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 06:11 AM2022-06-10T06:11:05+5:302022-06-10T06:11:39+5:30
अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या रस्तेमार्गावरील ताण कमी करण्याच्या दृष्टिकाेनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यात्रेकरुंना माेठा दिलासा मिळणार आहे.
नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी चांगली बातमी आहे. श्रीनगर येथून पंचतरणीपर्यंत थेट हेलिकाॅप्टर सेवा सुरू हाेणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर तसे निर्देश दिले आहे.
यात्रेला ३० जूनपासून सुरूवात हाेणार आहे. अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या रस्तेमार्गावरील ताण कमी करण्याच्या दृष्टिकाेनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यात्रेकरुंना माेठा दिलासा मिळणार आहे.
सध्या बालटाल आणि पहलगाम येथून पंचतरणीपर्यंत हेलिकाॅप्टर सेवा उपलब्ध आहे. दाेन्ही ठिकाणे श्रीनगरपासून ९० किलाेमीटरहून जास्त अंतरावर आहेत. या ठिकाणांवरुन एका दिवसांत १० हजार भाविकांनाच पुढे पायी जाण्याची परवानगी
आहे. दरवर्षी सुमारे ४ ते ५ लाख भाविक अमरनाथ यात्रेला जातात. यंदा ११ ऑगस्टपर्यंत यात्रा सुरू राहील.