आता तुमचा अंगठाच बनेल तुमची बँक - नरेंद्र मोदी

By admin | Published: December 30, 2016 04:57 PM2016-12-30T16:57:09+5:302016-12-30T18:00:12+5:30

BHIM अॅपच्या माध्यमातून केवळ अंगठ्याच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे "आपला अंगठाच आपली बँक" बनणार आहे

Now your thumb will become your bank - Narendra Modi | आता तुमचा अंगठाच बनेल तुमची बँक - नरेंद्र मोदी

आता तुमचा अंगठाच बनेल तुमची बँक - नरेंद्र मोदी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 -  डिजिटल व्यवहार  अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नावाने BHIM  अॅप विकसित करण्यात आले आहे. BHIM अॅपच्या माध्यमातून  केवळ अंगठ्याच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे "आपला अंगठाच आपली बँक" बनणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डीजी धन मेळाव्यात संबोधित करताना सांगितले. 
दिल्लीत सुरू असलेल्या डिजी धन मेळाव्यात मोदींनी BHIM हे नवीन मोबईल अॅप सुरू केले. या अॅपमुळे डिजिटल पेमेंट करणे अधिक सोपे होणार आहे. या मेळाव्यास संबोधित करताना  यावेळी पंतप्रधान म्हणाले की, "BHIM अॅपच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानातून केवळ अंगठ्याच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. "आपला अंगठाच आपली बँक" होईल.  एकेकाळी निरक्षरांना अंगठेबहाद्दूर म्हणून ओळखले जात असे, मात्र आता अंगठा हीच ओळख ठरेल. येत्या काळात BHIM अॅप जगात आश्चर्य म्हणून ओळखले जाईल."
मोदी पुढे म्हणाले,  "निराशावादी लोकांची कमी नाही, अशा निराशावादी लोकांसाठी माझ्याकडे काही औषध नाही. मात्र आशावादी लोकांसाठी माझ्याकडे खूप संधी  आहेत.  काही दिवसांपूर्वी लोक म्हणायचे 2जी मध्ये किती गेले, कोळशात किती गेले, याची चर्चा व्हायची, नोटाबंदीनंतर आता काल किती आले,  आज किती आले याची चर्चा होत आहे."
यावेळी मोदींनी नोटाबंदी, डिजिटल पेमेंटवर टीका करणाऱ्या  पी. चिदंबरम यांच्यावरही मोदींनी नाव न घेता टीका केली."एक नेताजी बोलले होते की मोदींनी डोंगर पोखरून उंदीर काढला,  पण असे उंदीरच शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान करतात. मला अर्थव्यवस्थेतले उंदीरच बाहेर काढायचे होते." असा टोला मोदींनी लगावला. 
भाषणाच्या सुरुवातीला कॅशलेस व्यवहार आणि ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांना देण्यात येत असलेल्या बक्षिसाबाबत मोदींनी भाष्य केले, " गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात राहत असलेल्या तरुण, महिलांनी ऑनलाइन पेमेंटची प्रणाली आत्मसात केली. त्यांचे मी अभिनंदन करतो. 50 रुपयांहून अधिक आणि तीन हजारांहून कमी रुपयांची ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन व्यवहार वाढावेत आणि  गरीबांना बक्षीस मिळावे हा त्यामागचा ऊद्देश आहे. पुढील 100 दिवसांत 340 कोटींची बक्षिसे वाटली जातील. तसेच 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी एक बंपर बक्षीस दिले जाईल,"असे मोदी म्हणाले. 
आर्थिक आणि भौतिक सुबत्तेमुळे एकेकाळी देशाला सोने कि चिडिया म्हटले जायचे त्याचाही उल्लेख मोदींनी यावेळी केला. "आजही या देशात 'सोनेकी चिडिया' बनण्याची क्षमता आहे, नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील नागरिकांनी एकजूट दाखवली. देशाची खरी ताकद दिसली." असे मोदी म्हणाले. BHIM अॅपच्या रूपात तुम्हाला नववर्षाची सर्वोत्तम भेट दिली आहे. आता नव्या वर्षात प्रत्येकाने किमात पाच व्यवहार तरी डिजिटल माध्यमातून करावेत, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले. 
 

Web Title: Now your thumb will become your bank - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.