आजकाल 'भारत माता की जय' बोलता की नाही यावरुन देशभक्ती ठरवली जाते - शशी थरुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2016 12:58 PM2016-03-21T12:58:01+5:302016-03-21T13:02:41+5:30
'आजकाल तुम्ही भारत माता की जय बोलता की नाही यावरुन तुमची देशभक्ती ठरवली जाते. मला बोलायला आवडेल पण मी प्रत्येकाला हे बोलायला भाग पाडलं पाहिजे का ?', असा सवाल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २१ - 'आजकाल तुम्ही भारत माता की जय बोलता की नाही यावरुन तुमची देशभक्ती ठरवली जाते. मला बोलायला आवडेल पण मी प्रत्येकाला हे बोलायला भाग पाडलं पाहिजे का ?', असा सवाल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी विचारला आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना जेएनयू प्रकरणावरुन त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजपा) जोरदार टीका केली.
'जे योग्य वाटतं आहे ते निवडण्याचा लोकांना हक्क असला पाहिजे. तसंच लोकशाहीत लोकांच्या कल्पनेबद्दल सहिष्णू असलं पाहिजे' असं शशी थरुर बोलले आहेत. 'आपल्या संविधानाने आपल्याला ज्याप्रकारे हवं ते बोलण्याचा अधिकार दिला आहे त्याचप्रमाणे न बोलण्याचाही अधिकार दिला आहे. कधी बोलायचं हे मी ठरवेन आणि हीच लोकशाही आहे. आपला देश फक्त हिंदी, हिंदू किंवा हिंदुस्तान नाही आहे, तर भारत आहे', असं शशी थरुर यांनी म्हंटलं आहे.
कृष्णा आणि कन्हैय्यासोबत आम्हाला हा भारत हवा आहे. अनेक महत्वाच्या विषयांवर देशात चर्चा सुरु केल्याबद्दल शशी थरुर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. 'तुम्ही येथे शिकण्यासाठी आला असाल मात्र तुम्ही देशाला शिकवतदेखील आहात. जेएनयूमध्ये जे काही झालं त्यामुळे देशाला देशद्रोह, स्वातंत्र्य, लोकशाहीसारख्या विषयांबद्दल देशाला माहिती मिळाली असल्यांच शशी थरुर बोलले आहेत.