एनआरआयला खरेदी करता येणार भारतात घर
By admin | Published: February 9, 2016 01:39 AM2016-02-09T01:39:55+5:302016-02-09T01:39:55+5:30
सध्या किंवा यापुढे देशात परतणाऱ्या अनिवासी भारतीयांना घर खरेदी करण्याची मुभा असल्याचा निर्वाळा सर्वोच्च राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे
नवी दिल्ली : सध्या किंवा यापुढे देशात परतणाऱ्या अनिवासी भारतीयांना घर खरेदी करण्याची मुभा असल्याचा निर्वाळा सर्वोच्च राष्ट्रीय ग्राहक आयोगाने दिला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे फ्लॅट खरेदी करणाऱ्या एकाला ताबा देण्यास नकार देणाऱ्या सुपरटेक लिमिटेड या कंपनीला या आयोगाने सदर मालमत्तेची ६४ लाख रुपये किंमत परत करण्याचा आदेश दिला.
मूळचे दक्षिण दिल्लीचे रहिवासी रेश्मा भगत आणि त्यांचे पुत्र तरुण भगत यांनी २००८ मध्ये ६३ लाख ९९ हजार ७२७ रुपये एवढ्या किमतीत सदर कंपनीच्या प्रकल्पांतर्गत एक फ्लॅट बुक केला होता. कंपनीने २००९ मध्ये फ्लॅटचा ताबा देऊ केला असताना सदनिकांचे बांधकाम झालेच नव्हते. त्यामुळे भगत यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे (एनसीडीआरसी) धाव घेत नुकसानभरपाईची मागणी केली होती. तरुण भगत हे एनआरआय असून त्यांनी वास् तव्यासाठी नव्हे तर केवळ नफा कमाविण्याच्या उद्देशाने हा फ्लॅट बुक केला असल्याचे सांगत कंपनीने नुकसानभरपाई देण्याचे नाकारले होते. त्यावर असा नियम तुम्ही बनवू शकत नाही. असे आयोगाने स्पष्ट केले.