अनिवासी भारतीय 500 गावांना घेणार दत्तक
By admin | Published: June 6, 2017 01:01 PM2017-06-06T13:01:50+5:302017-06-06T13:04:11+5:30
भारतातील जवळपास 500 गावे अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय दत्तक घेणार आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिंग्टन, दि. 06 - भारतातील ग्रामीण भागांचा विकास करण्याच्या दृष्टीने सरकार आणि काही सामाजिक संस्था सर्वच स्तरातून काम करत आहेत. तसेच, आता या ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी अनिवासी भारतीय पुढाकार घेणार आहेत. भारतातील जवळपास 500 गावे अमेरिकेत राहणारे अनिवासी भारतीय दत्तक घेणार आहेत.
यासंदर्भात अधिकृत घोषणा सिलिकॉन व्हॅलीमध्ये होणा-या "बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया" या कार्यक्रमादरम्यान करण्यात येणार आहे. "बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया" या कार्यक्रमाचे एक निवेदन जारी करण्यात आले असून हा कार्यक्रम येत्या एक जुलैला होणार आहे. तसेच, या कार्यक्रमात आधात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचे प्रवचन होणार असून या कार्यक्रमाला एक हजारहून अधिक अनिवासी भारतीय उपस्थित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
"बिग आयडियाज् फॉर बेटर इंडिया" कार्यक्रमाचे अध्यक्ष सतेज चौधरी म्हणाले की, शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी वाढण्याचे प्रमाण यामुळे भारतातील ग्रामीण विकासासाठी 500 गावे निवडण्यात आली असून ती दत्तक घेण्यात येणार आहेत. येत्या 2022 पर्यंत भारतातील शेतक-यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ करण्यासाठी आम्ही भू-वैज्ञानिक, कृषीतज्ज्ञ आणि उद्योगपतींना सोबत घेऊन काम करणार आहेत. या कार्यक्रमात भारतीय शेती, सरकार अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही सतेज चौधरी म्हणाले.