'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 07:55 PM2021-02-25T19:55:04+5:302021-02-25T19:56:45+5:30

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. (India china faceoff )

NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank | 'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

Next


नवी दिल्ली - पेंगाँग सरोवर भागातील उत्तर आणि दक्षिण काठावरुन भारत-चीनचे (India-China) सैन्य मागे हटले आहे. गेली काही महिने सुरु असलेल्या या तणावपूर्ण परिस्थितीत अनेक वेळा दोन्ही देशांचे सैनिक आमने सामने आले. हिंसक झटापटही झाली. मात्र, अखेर दोन्ही देशांच्या सैन्यांत सहमती होऊन  डिसएंगेजमेन्टची प्रक्रियाही सुरु झाली आहे. (NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank)

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. 

यासंदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले, की चीनसोबतच्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर एनएसए अजीत डोवाल यांच्या नेतृत्वात एक उच्च स्थरीय बैठक झाली. या बैठकीत सीडीएस जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवनेदेखील (manoj naravane) होते. या बैठकीत ऑगस्ट महिन्यात पेंगाँग सरोवराच्या दक्षिण काठावरील रणनीतीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या भागांवर कब्जा करण्यासंदर्भात प्लॅनिंग करण्यात आली.

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

या बैठकीदरम्यान रेजांग ला, रेचन ला, हेल्मेट टॉप आणि अकी ला यांच्यासह दक्षिणेकडील उंचावरील ठिकाणांवर कब्जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामागचा हेतू चीनला चर्चेच्या प्लॅटफॉर्मवर आणणे असा होता आणि नंतर घडलेही तसेच. यानंतर भारतीय जवानांनी पेंगाँगच्या दक्षिणेकडील उंच टेकड्यांवर कब्जा केला. यामुळे चीन संपूर्ण तणावात बॅकफुटवर राहिला. यामुळे चीनवर प्रचंड दबाव होता. कारण या कब्जामुळे भारत चीनच्या तुलनेत अधिक सरस झाला. 

याशिवाय चीनसोबतच्या तणावादरम्यान हवाईदल प्रमुखही सक्रिय होते. एयर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया हे देखील उत्तरेकडील सीमावर्ती भागांवर चिनी धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या तयारीसंदर्भात एनएसएला माहिती देत होते.

अजित डोवाल आपल्या गावी पोहोचले अन् मातृभाषेत संवाद साधून सर्वांचे मन जिंकले...

भारताच्या या अॅक्शनमुळे चीनला स्पष्ट संदेश मिळाला की भारत कुठल्याही प्रकारच्या आक्रमकतेचा सामना करण्यास तयार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच, आमच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. तसेच एनएसएने दिलेल्या सूचनाही अत्यंत उपयोगी आल्या, असे लष्कर प्रमुखांनी म्हटले होते.


 

Web Title: NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.