एनएससीएन (के) दहशतवादी संघटना

By Admin | Published: November 17, 2015 02:42 AM2015-11-17T02:42:58+5:302015-11-17T02:42:58+5:30

मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड-खापलांग (एनएससीएन-के) या नागा बंडखोरांच्या गटाला

NSCN (K) terrorist organization | एनएससीएन (के) दहशतवादी संघटना

एनएससीएन (के) दहशतवादी संघटना

googlenewsNext

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड-खापलांग (एनएससीएन-के) या नागा बंडखोरांच्या गटाला दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत सोमवारी दहशतवादी संघटना घोषित करण्यात आले.
सरकारने बेकायदेशीर कारवाया निर्मूलन कायदा १९६७ अंतर्गत एनएससीएन-के, संलग्न संघटना आणि गटांना दहशतवादी जाहीर केले आहे. मार्च २००१ मध्ये शांतता करार करणाऱ्या या गटाने यावर्षी मार्च महिन्यात शस्त्रसंधी करारातून एकतर्फी माघार घेतली होती. भारत-म्यानमार सीमेलगतचे त्यांच्या नियंत्रणात असलेले क्षेत्र परेश बरुआच्या नेतृत्वातील उल्फा गट, आय. के. सोंगबिजितप्रणीत एनडीएफबी सारख्या सशस्त्र संघटनांच्या दहशतवाद्यांसाठी सुरक्षित क्षेत्र असल्याचा आरोप होता.

Web Title: NSCN (K) terrorist organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.