दहशतवादी हल्ल्याच्या अभ्यासासाठी भारताकडून NSG टीम बांगलादेशला
By admin | Published: July 7, 2016 02:36 PM2016-07-07T14:36:25+5:302016-07-07T14:36:25+5:30
बांगलादेशमध्ये पाच दिवसांमध्ये झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांचा अभ्यास आणि सर्वेक्षण करण्यासाठी भारताकडून विशेष राष्ट्रीय सुरक्षा समूहाचं (एनएसजी) पथक बांगलादेशचा दौरा करणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 07 - बांगलादेशमध्ये पाच दिवसांमध्ये झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांचा अभ्यास आणि सर्वेक्षण करण्यासाठी भारताकडून विशेष राष्ट्रीय सुरक्षा समूहाचं (एनएसजी) पथक बांगलादेशचा दौरा करणार आहे. भारताने शेजारी देश बांगलादेशशी बातचीत करुन सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. बांगलादेशने भारताच्या एनएसजी पथकाला दौरा करण्यास परवानगी दिली असून चार सदस्यांचं पथक गुरुवारी ढाकाला रवाना होणार आहे.
ढाकामध्ये 1 जुलै रोजी बेकरीवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ला आणि गुरुवारी किशोरगंज परिसरात करण्यात आलेल्या हल्ल्याचा यावेळी अभ्यास करण्यात येणार आहे. या पथकात एनएसजी एक्स्पर्टचा समावेश असणार आहे. घटनास्थळी जाऊन नेमका हल्ला कसा झाला ? हल्ल्यात कोणतं साहित्य वापरण्यात आलं ? या सर्व गोष्टींची तपासणी केली जाणार आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय पथक दहशतवाद विरोधी कारवाईत सहभागी होणार नाही. फक्त बांगलादेश आणि भारत सरकारकडे आपला अहवाल सादर करणार आहे. ज्यामुळे तपासकार्यात मदत होईल. देशात कुठेही स्फोट किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास तपासासाठी एनएसजी टीमला पाठवले जाते. एनएसजीकडे जगभरात झालेल्या बॉम्बस्फोटांचा रेकॉर्ड आहे.