JEE Main 2021 : जेईई मेन परीक्षा आता प्रादेशिक भाषांमध्ये होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 11:23 AM2020-10-23T11:23:24+5:302020-10-23T11:38:36+5:30
JEE Main 2021 : सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच इंजिनिअरिंगसाठीची जेईई मेन परीक्षा (प्रवेश परीक्षा) घेतली जाते.
नवी दिल्ली - जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) संबंधी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. पुढील वर्षी होणारी जेईई मेन परीक्षा आता आणखी काही प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. संयुक्त प्रवेश मंडळाने (जेएबी) नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) हा निर्णय घेतला आहे. सध्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांमध्येच इंजिनिअरिंगसाठीची जेईई मेन परीक्षा (प्रवेश परीक्षा) घेतली जाते.
"राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हा निर्णय सरकारने आणलेल्या नव्या शिक्षण धोरणाला पुढे घेऊन जाईल. ज्या राज्यांमध्ये इंजिनिअरींग महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले जाते तिथे जेईई परीक्षा प्रादेशिक भाषेत घेण्यात येईल" असं ट्विट केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जेईई मेन परीक्षेत आणखी जास्त गुण मिळवण्यास मदत होईल. प्रादेशिक भाषांमध्ये जेईई परीक्षा घेतल्याने मेरिटमध्ये वाढ होईल. तसेच भाषेच्या अडचणीमुळे जे विद्यार्थी चांगले गुण मिळवू शकत नव्हते ते आणखी चांगले गुण मिळवण्यात सक्षम होतील असं देखील म्हटलं आहे.
📢Announcement📢
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) October 22, 2020
In line with the vision of #NEP2020, the Joint Admission Board (JAB) of #JEE (Main) has decided to conduct the JEE (Main) examination in more regional languages of India. @DG_NTA
पोखरियाल यांनी "या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं निदर्शनास आणून दिले आहे की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकनसाठीच्या (पीआयएसए) परीक्षेत उच्च स्थान मिळवणारे देश मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरतात. संयुक्त प्रवेश मंडळाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास आणि चांगले गुण मिळविण्यात मदत होईल" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
This decision has far-reaching implications as Hon'ble PM Shri @narendramodi ji has pointed out that top-scoring countries in PISA examination use mother tongue as a medium of instruction. The decision of JAB will help students comprehend questions better & score higher. @DG_NTA
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) October 22, 2020
कडक सॅल्यूट! पोलिसाने दिला मदतीचा हात, घेतली विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारीhttps://t.co/bPI7BE0JEn#education#coronavirus#Students
— Lokmat (@MiLOKMAT) October 19, 2020
कमाल! चिमुकल्याची जबरदस्त आहे शार्प मेमरी, वाचून तुम्हीही म्हणाल लय भारी!https://t.co/gHjL5w47Ef#AadithVishwanathGourishetty#WorldBookofRecord
— Lokmat (@MiLOKMAT) October 8, 2020