ऊर्जाक्षेत्रासाठी एनटीपीसीचा डिप्लोमा कोर्स. अहमदाबादची आयआयएम तयार करणार अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:43 IST2018-03-07T01:43:04+5:302018-03-07T01:43:04+5:30
ऊर्जा क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तथा सौरऊर्जा, विजेवरील गाड्यांचा वाढता वापर यांचा अर्थव्यवस्था व समाजावर होणाºया परिणामांचा वेध घेणारा दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम अहमदाबादची आयआयएम ही संस्था तयार करत आहे. आपल्या कर्मचाºयांसाठी एनटीपीसीने यासंदर्भात आयआयएमशी करार केला आहे.

ऊर्जाक्षेत्रासाठी एनटीपीसीचा डिप्लोमा कोर्स. अहमदाबादची आयआयएम तयार करणार अभ्यासक्रम
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - ऊर्जा क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तथा सौरऊर्जा, विजेवरील गाड्यांचा वाढता वापर यांचा अर्थव्यवस्था व समाजावर होणाºया परिणामांचा वेध घेणारा दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम अहमदाबादची आयआयएम ही संस्था तयार करत आहे. आपल्या कर्मचाºयांसाठी एनटीपीसीने यासंदर्भात आयआयएमशी करार केला आहे.
आयआयएमचे प्राध्यापक सुनीलकुमार महेश्वरी यांनी सांगितले की, एनटीपीसीच्या स्कूल आॅफ बिझनेसच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा एमबीए समकक्ष डिप्लोमाचा अभ्यासक्रम तयार करण्यास आम्ही त्यांना मदत करणार आहोत. ऊर्जेची गरज या मुद्द्याभोवतीच हा अभ्यासक्रम केंद्रित नसेल तर विविध पैलूंचाही त्यात समावेश करण्यात येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना ऊर्जा क्षेत्राविषयीचे अद्ययावत ज्ञान तर मिळेलच; पण त्यातील सामाजिक व आर्थिक पैलूंचेही भान येईल.