महात्मा गांधींहून एनटीआर महान

By admin | Published: January 19, 2017 04:57 AM2017-01-19T04:57:52+5:302017-01-19T04:57:52+5:30

महात्मा गांधी यांच्यापेक्षा एन.टी. रामाराव (एनटीआर) यांनी तेलुगू लोकांसाठी अधिक काम केले

NTR great from Mahatma Gandhi | महात्मा गांधींहून एनटीआर महान

महात्मा गांधींहून एनटीआर महान

Next


विजयवाडा : महात्मा गांधी यांच्यापेक्षा एन.टी. रामाराव (एनटीआर) यांनी तेलुगू लोकांसाठी अधिक काम केले, असे विधान करून तेलुगू देसम पक्षाच्या खासदाराने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
मचावरम गावातील एसआरआर अ‍ॅण्ड सीव्हीआर कॉलेजमध्ये तेलुगू देसमचे संस्थापक एन.टी. रामाराव यांचा पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना विजयवाडाचे खासदार केसिनेनी श्रीनिवास यांनी हे वादग्रस्त विधान केले. एनटीआर हे काही महात्मा गांधी नाहीत, असे सांगून काही लोकांनी त्यांचा पुतळा उभारण्यास विरोध केला होता. त्याला उत्तर देताना श्रीनिवास म्हणाले की, एनटीआर गांधींपेक्षा कमी नव्हते. किंबहुना त्यांनी तेलुगू जनतेसाठी गांधींहून अधिक काम केले.
विरोधी पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते निदर्शने करीत असूनही एनटीआर यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त कॉलेजच्या आवारात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. घोषणाबाजीद्वारे सोहळ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही निदर्शकांना पोलिसांनी अटक केली, तर इतरांना कॉलेजच्या परिसरातून बाहेर काढले.
>अडथळा नाही
पुतळा उभारण्यास एसएफआय, एआयएसएफ, एनएसयूआय आणि इतर विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेतला होता. तथापि, एनटीआर या कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याच्या आधारे तेलुगू देसमच्या नेत्यांनी पुतळा उभारण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते.
कॉलेज व्यवस्थापन आणि माजी विद्यार्थ्यांनी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले होते. एनटीआर यांचा पुतळा रस्त्यावर उभारला नसून, त्यामुळे वाहतुकीला अडथळाही होत नाही. त्यामुळे कोणाला आक्षेप घ्यायचे काही कारण नाही, असे श्रीनिवास म्हणाले.

Web Title: NTR great from Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.