पाणबुडीतून अण्वस्त्र मारा करणे शक्य; अख्खा पाकिस्तान, चीन आता टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 08:06 AM2024-12-03T08:06:57+5:302024-12-03T08:07:15+5:30

क्षेपणास्त्र चाचणी, ३,५०० किमी पल्ला

Nuclear weapons can be launched from submarines; All of Pakistan, China now in phase | पाणबुडीतून अण्वस्त्र मारा करणे शक्य; अख्खा पाकिस्तान, चीन आता टप्प्यात

पाणबुडीतून अण्वस्त्र मारा करणे शक्य; अख्खा पाकिस्तान, चीन आता टप्प्यात

नवी दिल्ली : भारताने अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या आणि तब्बल ३,५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचे नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सोमवारी सांगितले. ही चाचणी नौदलाच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या आयएनएस अरिघात या पाणबुडीतून विशाखापट्टणम किनारपट्टीवर २७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली असल्याचे मानले जाते. तशी माहिती देण्यात आली हाेती. मात्र, हे क्षेपणासत्र अण्वस्त्र सक्षम असल्याचे नाैदलप्रमुख त्रिपाठी यांनी स्पष्ट केले. ४ डिसेंबर या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी ते बोलत होते.

...अशी ही पहिलीच चाचणी

पाणबुडीतून डागता येऊ शकणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने घेतलेली ही पहिलीच चाचणी आहे. यामुळे भारत आता जमीन, आकाश आणि सागराखालून आण्विक क्षेपणास्त्रे डागता येण्याची क्षमता असलेल्या मोजक्या देशांत समाविष्ट झाला आहे.

२६ राफेल, ३ स्कॉर्पिन पाणबुड्यांची खरेदी

nनौदलासाठी उपयुक्त आधुनिक अशा २६ राफेल विमानांसह तीन स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या खरेदीसाठी भारत पुढील महिन्यात वेगवेगळ्या करारांवर स्वाक्षऱ्या करू शकतो, असे सांगून चीन आणि पाकिस्तानच्या नौदलांनी चालवलेल्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष असल्याचेही त्रिपाठी यांनी नमूद केले.

nआण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या दोन पाणबुड्यांच्या बांधणीला परवानगी दिली असून, अशा सहा पाणबुड्यांची निर्मिती केली जाणार आहे.

Web Title: Nuclear weapons can be launched from submarines; All of Pakistan, China now in phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.