नूंह हिंसाचार: बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी AAPचा बडा नेता मुख्य आरोपी, पक्षाने केला असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 07:07 PM2023-08-06T19:07:22+5:302023-08-06T19:20:31+5:30

Nuh violence: हरियाणामधील नूंह-मेवातमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, बजरंग दलाचे नेते प्रदीप शर्मा यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते जावेद अहमद हे वादात सापडले आहेत.

Nuh violence: AAP chief accused in Bajrang Dal leader's murder, party claims... | नूंह हिंसाचार: बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी AAPचा बडा नेता मुख्य आरोपी, पक्षाने केला असा दावा

नूंह हिंसाचार: बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी AAPचा बडा नेता मुख्य आरोपी, पक्षाने केला असा दावा

googlenewsNext

हरियाणामधील नूंह-मेवातमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, बजरंग दलाचे नेते प्रदीप शर्मा यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते जावेद अहमद हे वादात सापडले आहेत. पोलिसांनी हत्येप्रकरणी हरियाणा आप अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जावेद अहमद यांना मुख्य आरोपी बनवले आहे. एवढंच नाही तर त्यांची चौकशीही सुरू आहे. मात्र आप नेत्यांनी स्वत:वरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आम आदमी पक्षाने हा भाजपाचा कट असल्याचा दावा केला आहे. 

सोहना येथील निरंकारी चौक येथे ३१ जुलै रोजी बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रदीप कुमार यांची हत्या झाली होती. या प्रकरणी २ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद झाला होता. घटना घडली तेव्हा प्रदीप यांच्यासोबत त्यांचा मित्र पवन कुमारसुद्धा होता.  एफआयआरमधील उल्लेखानुसार नूंह येथील नलहड मंदिरामधून रेस्क्यू केल्यानंतर त्यांना नूंह येथील पोलीस लाईनमध्ये आणण्यात आले होते. तिथून रात्री १०.३० वाजता ते तीन वाहनांसह घराकडे निघाले. त्यांना एका एक पोलीस व्हॅन एस्कॉर्ट करत होती. सोहनाजवळ पोलीस व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी पुढील रस्ता मोकळा आहे, असे सांगितले आणि ते निघून गेले. 

मात्र पोलीस कर्मचारी जाताच एका स्कॉर्पिओने त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर केएमपी एक्स्प्रेस टोल प्लाझाजवळ त्यांच्या वाहनाला कारने ओव्हरटेक करत थांबवले. पवनने दिलेल्या माहितीनुसार तिथे असलेल्या जमावामध्ये जावेद अहमद हा सुद्धा उपस्थित होता. त्यानेच याला मारून टाका, बाकीचं मी बघतो, असं सांगितलं. त्यानंतर जमावाने या दोघांनाही कारमधून बाहेर काढत बेदम मारहाण केली. पवनला पोलिसांना कसेबसे वाचवले. मात्र प्रदीप त्यांच्या तावडीतून सोडवले. त्याच्या डोक्यावर रॉडने हल्ला केला होता. त्यानंतर प्रदीप याचा दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला. पवनने एफआयआरमध्ये लिहिले की, तो जावेद अहमदला चांगला ओळखतो. त्यांना सोहना येथेही २०० जणांचा जमाव भेटवा, त्याचं नेतृत्व  जावेद अहमद करत होता.

आपचा नेता जावेद अहमद याच्याबरोबरच काँग्रेस नेते आणि आमदार मान खान यांचंही नाव नूंहच्या हिंसाचारामध्ये समोर येत आहे.  त्यानंतर गुरुग्राम महापंचायतीमध्ये सरपंच असोसिएशनने दोघांविरोधात आघाडी उघडली आहे. एकत्र जमलेल्या लोकांनी काँग्रेस आमदार मामन खान यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच ४५ गावांमधील सरपंचांनी त्याबाबत हरियाणा विधानसभा अध्यक्षांच्या नावाने एक पत्रक दिले आहे.  

Web Title: Nuh violence: AAP chief accused in Bajrang Dal leader's murder, party claims...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.