धुक्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले, दरवर्षी 33000 अपघात तर 13000 मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 01:14 PM2021-11-05T13:14:16+5:302021-11-05T13:14:36+5:30
Road accidents:दरवर्षी सुमारे 4.5 लाख अपघात होतात, यात पाऊस आणि अपघातांमुळे होणाऱ्या अपघाचे प्रमाण 9 टक्के.
नवी दिल्ल: जसजसा हिवाळा ऋतू जवळ येत आहे तसतसे धुके पडू लागले आहे. धुक्यांमुळे सकाळी आणि संध्याकाळी दृश्यमानता कमी झाली आहे. या धुक्यामुळे अनेकदा रस्ते अपघात होतात, यात अनेकांचा मृत्यू होतो, तर बरेचजण गंभीर जखमी होतात. ईस्टर्न पेरिफेरलवर शुक्रवारी सकाळी सुमारे डझनभर वाहनांची धडक झाली. धुक्यामुळे हा अपघात झाला. एका रिपोर्टनुसार, धुक्यांमुळे देशभरात दरवर्षी सुमारे 33,000 रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये सुमारे 13,000 लोकांचा मृत्यू होतो.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात दरवर्षी सुमारे 4.5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी सुमारे 9 टक्के मृत्यू हे धुक्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात होतात. ईस्टर्न पेरिफेरलमध्ये धुक्यामुळे शुक्रवारी सुमारे डझनभर वाहने आदळली. त्याचबरोबर द्रुतगती मार्ग आणि महामार्गावरील अपघातांमध्ये दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, धुक्यात दृश्यमानता कमी झाल्यामुळे दरवर्षी रस्ते अपघात होतात. यामध्ये मृत्यूच्या तुलनेत जखमी झालेल्यांची संख्याही दुप्पट आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार एकूण रस्ते अपघातांपैकी 9 टक्के अपघात धुक्यामुळे होतात. जवळपास हाच आकडा पावसामुळे झालेल्या रस्ते अपघातांचा आहे. धुक्यामुळे होणा-या रस्ते अपघातात मृतांची संख्या दुप्पट आहे. अहवालानुसार सुमारे 25000 लोक जखमी होतात.
तज्ञ काय सांगतात ?
सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सतीश पांडे सांगतात की, धुक्यात बहुतेक रस्ते अपघात हे वाहनांच्या वेगामुळे होतात. महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर वाहनांचा वेग ताशी 100 आणि 120 किमी असल्याने अचानक समोर आलेले धुके दिसत नाहीत. अनेकवेळा एखादे वाहन काही कारणास्तव धुक्यात आधीच पार्क केलेले असते, अशा परिस्थितीत पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाला पार्क केलेले वाहन दिसत नाही आणि वाहने आदळतात. त्यामुळे महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरील वाहनाचा वेग धुक्याच्या काळात 50-60 किमी ठेवावा, जेणेकरून वाहन नियंत्रणात राहून अपघात टाळण्यासाठी आवश्यक तेव्हा थांबवता येईल.