मालवणी दारुकांडप्रकरणी आरोपींची संख्या १३

By admin | Published: July 31, 2015 10:25 PM2015-07-31T22:25:13+5:302015-07-31T22:25:13+5:30

मालवणी विषारी दारुकांड प्रकरण :

Number of accused in the case of Malwani drunken 13 | मालवणी दारुकांडप्रकरणी आरोपींची संख्या १३

मालवणी दारुकांडप्रकरणी आरोपींची संख्या १३

Next
लवणी विषारी दारुकांड प्रकरण :
अजून एकाला अटक
आरोपींची संख्या झाली १३
मुंबई: मालवणीत १०४ निष्पाप लोकांचा बळी घेणार्‍या विषारी दारुकांडासाठी जबाबदार असलेल्या अजून एकाला मुंबई क्राईम ब्रांचने बडोद्यातून गुरुवारी रात्री अटक केली. पोलिसांनी मुसक्या आवळलेला हा आरोपी गुजरातमध्ये २००९ साली झालेल्या विषारी दारुकांडातही दोषी असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. या मालवणी दारुकांड प्रकरणातील अटक आरोपींची संख्या एकूण १३ झाली आहे.
सुभाष गिरी (५८) असे अटक करण्यात आलेल्या या इसमाचे नाव असून तो सप्लायर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. २००९ साली गुजरातमध्ये घडलेल्या विषारी दारुकांडात जवळपास १३६ लोकांचा बळी गेला होता. त्यात गिरी हा मुख्य आरोपी असल्याचीही माहिती मिळाली. पोलिसांनी अटक केलेल्या मोहम्मद लतिफ खान उर्फ आतिकशी गिरीची सहा महिन्यांपूर्वी भेट झाली होती. त्यानुसार ते एकमेकांच्या संपर्कात होते. जुलै २००९ रोजी गुजरातमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ साली त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला. जामिनावर बाहेर असणार्‍या गिरीने पुन्हा मिथेनॉल पुरविण्याचा व्यवसाय सुरु केला. बडोद्यामध्येच त्याचे कुटुंब राहत असून २००९ साला पूर्वीपासून तो हा व्यवसाय करत असल्याचे उघड झाले आहे.
...........................
(चौकट)
हे १२ आरोपी आधीच अटकेत
यापूर्वी याप्रकरणी ममता लक्ष्मण राठोड, किशोर पटेल, इग्नेस ग्रेसी ऊर्फ आंटी, राजू हनमंता पास्कर ऊर्फ लंगडा, मन्सूर खान ऊर्फ आतिक, डोनाल्ड पटेल, गौतम हरते, सालिमुद्दिन शेख, फ्रान्सिस डिमेलो, लिलाधर पटेल, प्रकाशभाई ऊर्फ लालजीभाई पटेल, गीता उर्फ सिमरन सय्यद यांना अटक करण्यात आली आहे.
...........................

Web Title: Number of accused in the case of Malwani drunken 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.