विमान प्रवाशांच्या संख्येत तब्बल २० टक्के वाढ
By admin | Published: April 15, 2016 03:01 AM2016-04-15T03:01:23+5:302016-04-15T03:01:23+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे विमान इंधनाच्या किमतीमध्येही लक्षणीय कपात होताना दिसत असून यामुळे विमान प्रवाशांच्या संख्येत आतापर्यंत २० टक्के
Next
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे विमान इंधनाच्या किमतीमध्येही लक्षणीय कपात होताना दिसत असून यामुळे विमान प्रवाशांच्या संख्येत आतापर्यंत २० टक्के वाढ नोंदली गेली आहे. आगामी काळात असलेला पर्यटनाचा हंगाम पाहता विमान प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ अपेक्षित आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नव्या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत विमान इंधनाच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २३ टक्क्यांनी कपात झाली असून यामुळे विमान कंपन्यांनी तिकिटाचे दरही काही प्रमाणात कमी केले आहेत. विमान व्यवसायाचे गणित इंधनाच्या किमतीभोवती फिरते; पण यामध्ये लक्षणीय कपात झाली आहे.