राज्यसभेत वाढेल भाजपाची संख्या, प्रकाश जावडेकर यंदा महाराष्ट्रातूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:11 AM2018-02-25T00:11:22+5:302018-02-25T00:11:22+5:30
राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होत असून, या द्वैवार्षिक निवडणुकीत भाजपाचा लाभ होणार आहे. सभागृहात भाजपाच्या २६ जागा वाढतील, तर काँग्रेस ७ जागा जिंकू शकेल.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होत असून, या द्वैवार्षिक निवडणुकीत भाजपाचा लाभ होणार आहे. सभागृहात भाजपाच्या २६ जागा वाढतील, तर काँग्रेस ७ जागा जिंकू शकेल.
या निवडणुकीत ६ केंद्रीय मंत्री व २ राज्यमंत्र्यांना भाजपा पुन्हा संधी देईल, परंतु ३ कॅबिनेटमंत्र्यांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठी इतर राज्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. अरुण जेटली गुजरातमधून तिसºयांदा राज्यसभेवर निवडले गेले. या खेपेस त्यांना उत्तर प्रदेशातून निवडून आणावे लागेल. भाजपाचे राज्यसभेतील संख्याबळ वाढणार असले, तरी गुजरातमधून २ जागा गमवाव्या लागतील.
विद्यमान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर मध्य प्रदेशऐवजी महाराष्ट्रातून पाठवावे लागेल. कारण मध्य प्रदेशात वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका आहेत. राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजपा नेत्यांच्या या वेळी प्राधान्याने विचार पक्षाला करावा लागणार आहे. त्यातच प्रकाश जावडेकर मूळचे पुण्याचेच आहेत. महाराष्ट्रातील तीनही जागा भाजपा सहजपणे जिंकेल.
केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही भाजपाला विहारऐवजी उत्तर प्रदेशच्या कोट्यात आणावे लागणार आहे. बिहारमधून भाजपा १ जागा जिंकू शकेल. या जागेसाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद प्रबळ दावेदार आहेत. यंदा उत्तर प्रदेशातील १० पैकी ८ जागा जिंकणे, ही भाजपासाठी घसघशीत कमाई असेल. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत लवकरच ७४व्या वर्षांत प्रवेश करीत आहेत, तरी त्यांना मिळेल. कारण ते मध्य प्रदेशातील दलित नेते आहेत. आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा पक्षश्रेष्ठींच्या खास मर्जीतील असल्याने, त्यांना हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर आणण्यात अडचण नाही. त्यांच्याकडे भाजपाच्या संसदीय मंडळाचे सचिवपदाची जबाबदारी आहे.
या निवडणुकीनंतर भाजपाची राज्यसभेतील एकूण संख्या ५८ वरून ६७ वर पोहोचेल. भाजपाला ५८ जागांपैकी २६ जागा मळतील. त्याचे १७ सदस्यच निवृत्त होणार आहेत. ९े जागा वाढणार असल्याने, भाजपाकडून कदाचित सचिन तेंडुलकर व अनू आगा यांना राष्ट्रपतीनियुक्त म्हणून पुन्हा संधी मिळू शकेल.
भाजपाकडून राम माधव, मुरलीधर राव, अरुण सिंग व अनिल जैन या चेहºयांना संधी मिळू शकेल. भूपेंद्र यादव यांना राजस्थानातून तर अजय संचेती यांना महाराष्ट्रातून पुन्हा संधी मिळेल.
काँग्रेस महाराष्ट्र, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधून प्रत्येकी एक जागा आणि कर्नाटक व गुजरातमधून २ जागा जिंकू शकणार आहे. गुजरातमधून दुसरी जागा जिंकणे हे काँग्रेसला आव्हान ठरेल. लालू प्रसादांच्या पक्षाच्या मदतीने काँग्रेस बिहारमधून १ जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करेल. बिहारमधून विरोधकांतर्फे शरद यादव यांना मिळू शकेल. काँग्रेसला राज्यसभेत नरेंद्र मोदींना तोडीस तोड देऊ शकेल, असा हिंदीभाषक नेता
हवा आहे. राहुल गांधीही तसा विचार करीत आहेत.
काँग्रेसचे बळ कमी होणार
या निवडणुकीत राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ ५४ वरून घटून ४९ वर येणार आहे. काँग्रेसचे १४ राज्यसभा खासदारांचा कार्यकाल संपत आहे. त्यातील ७ जणांना पुन्हा संधी दिली जाणार आहे.
३ राज्यांत घोडेबाजार?
बिहार, कर्नाटक व उत्तर प्रदेशातील शिल्लक ३ जागा चर्चेत राहणार आहेत. तिथे स्वबळावर कोणताही पक्ष आपला उमेदवार निवडून आणू शकणार नसल्याने, तिथे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
प्रकाश जावडेकर यांना या खेपेस मध्य प्रदेशऐवजी महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर संधी द्यावी लागणार आहे.
रविशंकर प्रसाद हे भाजपामधील प्रबळ दावेदार आहेत. भाजपाला त्यांना बिहारच्या एका जागेवर संधी द्यावीच लागेल.
जे. पी. नड्डा पक्षश्रेष्ठींच्या खास मर्जीतले असल्याने हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर सहजपणे निवडून येतील.