CoronaVirus News: "येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढणार; पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 05:12 PM2020-06-07T17:12:55+5:302020-06-07T17:14:58+5:30
संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्थेतील माजी प्राध्यापकांचा अंदाज
लखनऊ: जगातील कोरोना रुग्णांची संख्या ७० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ४ लाखांच्या पुढे गेला आहे. येत्या काही दिवसांतही कोरोना रुग्णांची संख्या वाढती राहणार असल्याचा अंदाज संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्थेचे माजी प्राध्यापक डॉ. मदन मोहन गोडबोले यांनी व्यक्त केला. कोरोनाबाधितांची संख्या वाढेल. पण विषाणू कमजोर होऊ लागल्यानं मृत्यूंचं प्रमाण कमी होईल, अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली.
सध्या बहुतांश शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यात व्यग्र आहेत. त्यातच अनलॉकच्या माध्यमातून देशातील जनजीवन पूर्वपदावर आल्यावर काय होईल, असा प्रश्न लोकांना पडला आहे. रस्ते, बस, रेल्वेमध्ये गर्दी वाढल्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृतांची संख्या वाढेल, अशी भीती अनेकांवा वाटते. मात्र आपण विषाणूच्या उत्क्रांतीचा सिद्धांत लक्षात घेतल्यास चिंता कमी होईल, असं गोडबोले यांनी सांगितलं.
'विषाणूकडे दोन पद्धतीनं पाहिलं जातं. एक विषाणू जास्त धोकादायक असतो, तर दुसरा तितकासा घातक नसतो. धोकादायक विषाणूचा प्रसार कमी लोकांमध्ये होतो. तर तुलनेनं कमी धोकादायक विषाणूचा संसर्ग मात्र कमी जणांना होता. उत्क्रांतीचा सिद्धांत लक्षात घेतल्यास दोन विषाणूंच्या स्पर्धेत कमी धोकादायक विषाणू यशस्वी होतो. कारण त्याला जास्त दिवस आपल्या भोजन पुरवायचं असतं. त्याचं भोजन माणूस आणि इतर पशू असतात. विषाणू भोजनावर अवलंबून असतो आणि त्यामुळे हे भोजन संपू नये, असं त्याला वाटतं. त्यामुळे जास्त लोकांना बाधा होऊनही तो त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत नाही,' असं गोडबोले यांनी सांगितलं.
...अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरल
रुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्...
"कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"