देशात कोरोनाबाधितांची संख्या २६ हजारांच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 06:02 AM2020-04-26T06:02:26+5:302020-04-26T06:02:37+5:30
देशात शनिवारी या आजाराच्या रुग्णांची संख्या 25 हजारांच्या घरात गेली आहेत. जगात कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा २ लाखांपर्यंत गेला आहेत.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूंच्या संसर्गाने भारत आणि संपूर्ण जगभरात थैमान घातले असून, देशात शनिवारी या आजाराच्या रुग्णांची संख्या 25 हजारांच्या घरात गेली आहेत. जगात कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा २ लाखांपर्यंत गेला आहेत.
देशात कोरोनाबाधितांचा आकडा २६ हजार २६७ वर गेला असून, त्यापैकी ७ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही रुग्णांची संख्या प्रत्येकी २ हजारांच्या वर गेला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ८२५ जण मृत्युमुखी पडले.
देशभर लॉकडाऊन असताना संख्या ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता, लॉकडाऊन नसता तर रुग्णांची संख्या कैक पटीने वाढू शकली असती. त्यामुळे ३ मेनंतरही देशातील १८० जिल्ह्यांमध्ये तो वाढवला जाईल, अशी शक्यता आहे.
>जगात रुग्णांची संख्या २८ लाख ७४ हजारांपर्यंत गेला असून, मृतांची संख्या २ लाख ८१२ झाला. अमेरिकेत मृतांची संख्या ५२ हजार ३५६ झाला आहे. एकूण मृत्यूंपैकी एक चतुर्थांश अमेरिकेत आहेत. इटली (२६ हजार ), स्पेन (२२ हजार ९०२), फ्रान्स (२२ हजार २४५), ब्रिटन (२० हजार ३१९) आणि बेल्जियम (६ हजार ९१७) या देशांतही मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे.