कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाखाच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 06:34 AM2020-10-03T06:34:17+5:302020-10-03T06:34:45+5:30

एकूण रुग्णसंख्या ६४ लाख; ५३ लाख लोक झाले बरे

The number of Corona victims is in the millions | कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाखाच्या पुढे

कोरोनाच्या बळींची संख्या 1 लाखाच्या पुढे

Next

नवी दिल्ली : देशामध्ये शुक्रवारी कोरोनाचे ८१,४८४ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ६४ लाखांहून अधिक झाली आहे. तसेच आतापर्यंत ५३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनामुळे आणखी १०९५ लोक मरण पावले असून त्यामुळे बळींची एकूण संख्या एक लाख ३२३ वर गेली आहे.

देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ६३,९४,०६८ इतकी असून ५३,५२,०७८ जण या आजारातून बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८३.७० टक्के आहे. गेल्या १२ दिवसांत १० लाख कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात ९,४२,२१७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत १४.७४ टक्के आहे. या आजाराच्या रुग्णांचा मृत्युदर १.५६ टक्के इतका कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा सुमारे १० लाखांनी कमी आहे. तर, रुग्णसंख्येच्या क्रमवारीत तिसºया क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये ४८ लाख कोरोना रुग्ण आहेत.

कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,५८६, कर्नाटकमध्ये ८,९९४, आंध्र प्रदेशमध्ये ५,८६९, दिल्लीमध्ये ५४०१, पश्चिम बंगालमध्ये, गुजरातमध्ये ३,४६०, पंजाबमध्ये ३,४५१, मध्य प्रदेशमध्ये २,३३६ इतकी आहे.

चाचण्यांची संख्या सात कोटी ६७ लाखांवर
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल
रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने
दिलेल्या माहितीनुसार, १ आॅक्टोबर रोजी १०,९७,९४७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशभरात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ७,६७,१७,७२८ आहे.

२०३ दिवसांत एकावरून एक लाखांवर पोहोचली बळींची संख्या
30.94% इतका उच्चांकी मृत्युदर भारताने ३ एप्रिल रोजी गाठला होता. तो आता १.५६ टक्के इतका कमी ठेवण्यात भारताला यश आले आहे.

Web Title: The number of Corona victims is in the millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.