कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच; रविवारी राज्यात १६ हजार; तर देशभरात २५ हजार रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 06:56 IST2021-03-15T01:35:52+5:302021-03-15T06:56:14+5:30
राज्यात दिवसभरात ८,८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २१,३४,०७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के एवढे झाले आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच; रविवारी राज्यात १६ हजार; तर देशभरात २५ हजार रुग्णांची भर
मुंबई/नवी दिल्ली : राज्यातील काेराेना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रविवारी १६ हजार ६२० काेराेनाबाधितांचे निदान झाले असून ५० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे काेरोनाबाधितांची एकूण संख्या २३,१४,४१३ झाली असून बळींचा आकडा ५२ हजार ८६१ आहे, तर मुंबईत दिवसभरात १९०० काेराेना बाधित आढळले असून ७ मृत्यू झाले. (As the number of coronavirus increases; 16,000 in the state on Sunday; An additional 25,000 patients across the country)
राज्यात दिवसभरात ८,८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २१,३४,०७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के एवढे झाले आहे.
मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांजवळ -
मुंबईत रविवारी १ हजार ९६२ नवे काेरोना रुग्ण आढळून आले असून ७ जणांचामृत्यू झाला आहे. मागील काही दिवसातील दैनंदिन काेराेनाबाधितांचा हा सर्वाधिक आकडा आहे.
देशात ८४ दिवसांतला उच्चांक
- देशभरात रविवारी कोरोनाचे २५ हजार नवे रुग्ण आढळून आले. गेल्या ८४ दिवसांतला हा उच्चांक आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाख १० हजार ५४४ आहे. त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १.८५ टक्के आहे.
- या संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ९ लाख ८९ हजार असून, त्याचे प्रमाण ९६.७५ टक्के आहे. या प्रमाणात सध्या घट दिसून येत आहे.