जगभरातील नेटकऱ्यांची संख्या ३.२ अब्जावर

By admin | Published: February 24, 2016 02:42 AM2016-02-24T02:42:45+5:302016-02-24T02:42:45+5:30

संपलेल्या वर्षात जागतिक स्तरावर नेटकऱ्यांच्या संख्येत विक्रमी ३० कोटींची वाढ होऊन इंटरनेट सेवा ३.२ अब्ज ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे. स्वस्त दरातील इंटरनेटची उपलब्धता

The number of network worldwide is 3.2 billion | जगभरातील नेटकऱ्यांची संख्या ३.२ अब्जावर

जगभरातील नेटकऱ्यांची संख्या ३.२ अब्जावर

Next


हैदराबाद : संपलेल्या वर्षात जागतिक स्तरावर नेटकऱ्यांच्या संख्येत विक्रमी ३० कोटींची वाढ होऊन इंटरनेट सेवा ३.२ अब्ज ग्राहकांपर्यंत पोहोचली आहे. स्वस्त दरातील इंटरनेटची उपलब्धता आणि जागतिक उत्पन्नातील वाढीमुळे हे शक्य झाल्याचे सोशल मीडियातील मुख्य कंपनी फेसबुकने स्पष्ट केले आहे.
जागतिक पातळीवरील ‘इंटरनेट संपर्क स्थिती २०१५’ या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली. २०१४ च्या अखेरपर्यंत इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या २.९ अब्ज होती ती २०१५ च्या अखेरीस ३.२ अब्जवर गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी ४३ टक्के आहे. २०१४ मध्ये ५० कोटी ग्राहकांसाठी ५०० एमबी मोबाईल इंटरनेट डाटा स्वस्त झाला. अद्यापही १.६ अब्ज मोबाईलधारक ब्रॉडबॅडच्या कक्षेबाहेर असून २०१४ तुलनेत ही संख्या कमी आहे. त्यावेळी २ लाखांवर लोक इंटरनेटच्या संपर्कात नव्हते, असे अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

२०१५ मध्ये सुमारे २.७ लोकांकडे मोबाईल कनेक्शन नव्हते. विकसनश्ील देश अद्यापही इंटरनेटच्या वापरात मागे आहे. शहरी क्षेत्राच्या तुलनेत अनेक ग्रामीण भागही इंटरनेटपासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे.

 

Web Title: The number of network worldwide is 3.2 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.