कर्करुग्णांची संख्या दोन वर्षांत १५.७ लाखांपर्यंत; सरकारची राज्यसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 09:43 AM2023-03-15T09:43:59+5:302023-03-15T09:44:35+5:30
आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र योजनेंतर्गत या सामान्य कर्करोगांसाठी तपासणी हा सेवेचा अविभाज्य भाग आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार (एनसीपीआर) देशातील कर्करोगाच्या रुग्णांची संख्या २०२२ मधील १४.६ लाखांवरून २०२५ पर्यंत १५.७ लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, अशी माहिती सरकारतर्फे मंगळवारी राज्यसभेत देण्यात आली.
आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आणि सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवेचा एक भाग म्हणून मधुमेह, उच्च रक्तदाब, सामान्य कर्करोगासारख्या असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध, नियंत्रण व तपासणीसाठी उपक्रम सुरू केले आहेत. आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र योजनेंतर्गत या सामान्य कर्करोगांसाठी तपासणी हा सेवेचा अविभाज्य भाग आहे.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभाग राज्यांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या आधारे कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि स्ट्रोक प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक साह्य प्रदान करण्यात येते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"