लॉकडाऊन शिथिलतेनंतरही वाढतेय रुग्णांची संख्या, देशात ५२,९५२ कोरोना पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 10:01 AM2020-05-07T10:01:47+5:302020-05-07T10:02:18+5:30

केंद्र सरकारने लॉकडाऊनला काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. मात्र, अद्याप रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. देशात आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढतच आहे.

Number of patients continues to rise despite lockdown relaxation, 52,952 corona positive in country MMG | लॉकडाऊन शिथिलतेनंतरही वाढतेय रुग्णांची संख्या, देशात ५२,९५२ कोरोना पॉझिटीव्ह

लॉकडाऊन शिथिलतेनंतरही वाढतेय रुग्णांची संख्या, देशात ५२,९५२ कोरोना पॉझिटीव्ह

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा हाहाकार भारतात सुरूच असून, बुधवारी रुग्णसंख्या ५२,९५२ एवढी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णांची संख्या ३५६१ ने वाढली असून ८९ मृत्युंची नोंद झाली आहे. त्यामुळे, लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतरही देशातील रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. गेल्या तीन दिवसांत ४० हजारांमध्ये तब्बल १२ हजार रुग्णांची भर पडल्याने पुढच्या काही दिवसांतच भारतात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सर्वांत वर जाऊन स्थिर होण्याची भीती आरोग्य मंत्रालयास आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत असल्याने आता आरोग्य यंत्रणा सुधारित स्ट्रॅटेजीवर विचार करीत आहे. 

केंद्र सरकारने लॉकडाऊनला काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. मात्र, अद्याप रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. देशात आणि महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढतच आहे. देशात गेल्या २४ तासांत ३५६१ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून रुग्णांची संख्या ५२९५२ झाली आहे. त्यामध्ये, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३५९०२ असून १५२६७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, देशात आतापर्यंत १७८३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक १६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण असून, एकट्या मुंबईत त्यातील ९ हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आहेत.
सतत समन्वय, केंद्रीय पथक दोनदा पाठवूनदेखील मुंबईत दररोज नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यांच्या समन्वयावरदेखील प्रश्नचिन्ह लागले आहे. केंद्र सरकार टेस्ट कीट्स पुरेसे उपलब्ध असल्याचे सांगून राज्यांना चाचण्यांची संख्या
वाढविण्याची सूचना करीत आहे. त्यातच गेल्या २४ तासात महाराष्ट्रातही 1233 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 16758 अशी झाली आहे. तर नवीन 275 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 3094 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.रुग्ण

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करताना पहिल्याच आठवड्यात ४९ हजार ४३६ चा आकडा रुग्णसंख्येने गाठल्याने आरोग्य यंत्रणेत अस्वस्थता आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकार सज्जतेचा दावा करीत आहे. रुग्ण वाढीचे कारण मात्र अद्याप केंद्र सरकारला स्पष्ट करता आले नाही. रेड झोन, कंटेन्मेंट क्षेत्र, फिजिकल डिस्टन्सिंगवर भर देणाºया केंद्र सरकारने मद्य दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यावर गर्दी उसळली. अनेक राज्यांमध्ये त्यामुळे चिंता वाढली. मद्य दुकानांवर वाढणारी गर्दी, स्थलांतरित मजुरांची गृह राज्यात परतण्यावर आता कोरोना रुग्णांची वाढ अवलंबून असेल, असा दावा सूत्रांनी केला. आरोग्य मंत्रालय दिवसभरातून दोनदा कोरोना रुग्णांची आकडेवारी अपडेट करीत असे. आता मात्र दिवसातून एकदाच ही आकडेवारी देण्यात येईल.

आणखी वाचा

कांद्याचे भाव गडगडणार, शेतकऱ्यांसाठी अजित पवारांची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी

तळमळणाऱ्या तळीरामांचा तळतळाट टळो!

 

Web Title: Number of patients continues to rise despite lockdown relaxation, 52,952 corona positive in country MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.