देशात दिवसभरात वाढले ८३८० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 04:50 AM2020-06-01T04:50:44+5:302020-06-01T04:51:02+5:30

आतापर्यंत ५,१६४ जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

The number of patients in the country increased by 8380 during the day | देशात दिवसभरात वाढले ८३८० रुग्ण

देशात दिवसभरात वाढले ८३८० रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन संपवून देशात पाचव्या टप्प्यातील टाळेबंदीची घोषणा करण्यात आली असतानाच रविवारी केवळ एका दिवसात नव्या कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ३८० वाढली आहे, तर देशातील कोरोनामुळे एकूण दगावलेल्यांची संख्या ५ हजार १६४ इतकी झाली आहे. एकूण बाधितांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मााहितीनुसार, देशात सध्या कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १,८२,१४३ इतकी आहे. देशात महाराष्ट्र कोरोनामुळे सर्वाधिक बाधित ठरला आहे. इथे सध्या ६५,१६८ कोरोनाबाधित आहेत, तर ४३,८९0 जणांवर उपचार सुरू आहेत आणि 28,081 जण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने अद्याप एकूण २१९७ जणांचे बळी
घेतले आहेत. दिल्लीत सध्या १८,५४९ कोरोनाबाधित आहेत, तर १०,०५८ जणांवर उपचार सुरू आहेत आणि ८,०७५ जण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. दिल्लीत कोरोनाने अद्याप एकूण ४१६ जणांचे बळी घेतले आहेत.
मध्य प्रदेशात सध्या ७८९१ कोरोनाबाधित आहेत, तर ३१०४ जणांवर उपचार सुरू आहेत आणि ४,४४४ जण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत, तर कोरोनाने अद्याप एकूण ३४३ जणांचे बळी घेतले आहेत.
कोरोना संसगार्मुळे गुजरातमधील स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. गुजरातमध्ये सध्या १६,३४३ कोरोनाबाधित आहेत, तर एकूण १००७ जणांचे बळी गेले आहेत.
तमिळनाडूमध्ये सध्या २१,१८४ कोरोनाबाधित आहेत, तर ९०२४ जणांवर उपचार सुरू आहेत आणि एकूण १६० जणांचे बळी घेतले आहेत. उत्तर प्रदेशात बाधितांची संख्या ७४४५ वर पोहोचली आहे, तर २०१ जणांचे बळी गेले आहेत.
बिहारमध्ये आतापर्यंत ३६३६, चंदीगड २८९, छत्तीसगढ ४४७, गोवा ७०, हरयाणा १९२३ तर झारखंडमध्ये ५६३ कोरोनाबाधित आढळले आहेत. पूर्वेतील राज्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.


रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला
देशात बाधित आणि बळींचा आकडा सातत्याने वाढत असताना समाधानाची बाब एकच आहे की, कोरोना रुग्णांची आकडेवारी दुप्पट होण्याचा कालावधी आधीपेक्षा वाढला असून, मृत्युदरही कमी झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मााहितीनुसार, रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५.४ दिवसांवर आला आहे. हा कालावधी मागील दोन आठवड्यांत १३.३ दिवस इतका होता. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दरही कमी होऊन २.५५ टक्के इतका झाला आहे. मागील आठवड्यात हाच दर २.८६ टक्के इतका होता.

Web Title: The number of patients in the country increased by 8380 during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.