भारतीय नागरिकत्व घेणाऱ्यांपेक्षा साेडणारे २५ पटीने वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 06:06 AM2022-01-01T06:06:51+5:302022-01-01T06:07:57+5:30
Indian citizenship: परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या २०२१ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील माहितीतून ही माहिती उघडकीस आली आहे.
नवी दिल्ली : भारताचे नागरिकत्व साेडून इतर देशांचे नागरिक हाेणाऱ्यांच्या संख्येत माेठी वाढ झाली आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. परदेशी नागरिकांकडून भारताचे नागरिकत्व घेणाऱ्यांची ५ वर्षांमध्ये जेवढी संख्या हाेती, त्यापेक्षा २५ पटीने भारतीय नागरिकत्व साेडणाऱ्यांची संख्या झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या २०२१ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील माहितीतून ही माहिती उघडकीस आली आहे.
सप्टेंबर २०२१पर्यंत १.१ लाख भारतीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला. त्यातुलनेत ४१७७ परकीय नागरिकांनी २०१६ ते २०२० या पाच वर्षांमध्ये भारताचे नागरिकत्व स्वीकारले. याशिवाय १० हजार ६३५ जणांचे अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.