व्हॉट्सअॅप ग्रुप युझर्सची संख्या वाढली २५६ पर्यंत

By admin | Published: February 4, 2016 04:38 PM2016-02-04T16:38:00+5:302016-02-04T16:38:13+5:30

मोबाईलवरून मेसेजेस करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे आणि आजच्या घडीला प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हॉट्सअॅपने २५६ पर्यंत वाढवली

The number of WhatsApp users increased to 256 | व्हॉट्सअॅप ग्रुप युझर्सची संख्या वाढली २५६ पर्यंत

व्हॉट्सअॅप ग्रुप युझर्सची संख्या वाढली २५६ पर्यंत

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - मोबाईलवरून मेसेजेस करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे आणि आजच्या घडीला प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हॉट्सअॅपने आता ग्रुप मेंबर्सची संख्या वाढवली असून आता एका ग्रुपमध्ये तब्बल २५६ मेंबर्स अॅड करता येतील. आजघडीला व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या १०० कोटीच्या घरात पोहचली असून व्हॉट्सअॅपने काही वाढीव फीचर्स आणली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्रुप मेंबर्सची संख्या वाढवण्याची सुविधाही दिली आहे. सुरूवातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ५० युझर्सचं असतं, त्यानंतर ती संख्या १०० आणि आता ही संख्या तब्बल २५६ इतकी केली आहे.
फेब्रुवारी २०१४ मध्ये फेसबुकने १९ अब्ज डॉलरमध्ये व्हॉट्सअॅपची खरेदी केली होती. आत्तापर्यंत फेसबुककडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा व्यवहार होता. फेसबुकवर एका पोस्टमध्ये व्हॉट्सअॅपचा सह-संस्थापक जॉन कोउमने सांगितलं की, या प्लॅटफॉर्मवर दररोज ४२ अब्ज मेसेज, १.६ अब्ज फोटो आणि २५ कोटी व्हिडिओ शेअर केले जातात.
 
व्हॉट्सअॅपची काही नवी फीचर्स :
- एका ग्रुपमध्ये आता २६५ मेंबर्स अॅड करता येतील
- ग्रुप म्युट प्रमाणेच कॉनटॅक्ट चॅटही (इंडिव्हिज्युअल) म्युट करता येणार आहे. त्याचा कालावधी ८ तासांपासून १ वर्षापर्यंत आहे. 
- ग्रुपमध्ये एकपेक्षा अधिक अॅडमिन बनवता येतात.
- व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज निवांत वाचायचा असल्यास तो बुकमार्क करता येतो. त्यासाठी कोणत्याही मेसेजवर टॅप करून तो होल्ड करायचा त्यानंतर वरील टूलबारमध्ये डिलीटच्या शेजारीच तुम्हाला स्टार (*) आयकॉन दिसेल. अॅपच्या मेन्यूमध्ये स्टार्ड मेसेजेसचे फोल्डर दिसेल, ज्यात आत्तापर्यंतचे बुकमार्क केले सर्व मेसेज वाचता येतील.
- व्हॉट्सअॅपने नवीन इमोजी व अधिक स्कीन टोन उपलब्ध करून दिले आहेत. 

 

Web Title: The number of WhatsApp users increased to 256

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.