भारतात महिला स्मोकर्सची संख्या वाढली
By Admin | Published: December 28, 2015 01:20 PM2015-12-28T13:20:34+5:302015-12-28T13:20:34+5:30
महिलांचे धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धुम्रपान करणा-या महिलांमध्ये अमेरिकेपाठोपाठ भारत दुस-या स्थानावर आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - भारतात सिगारेट ओढणा-यांची संख्या झपाटयाने कमी होत असली तरी, महिलांचे धुम्रपान करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धुम्रपान करणा-या महिलांमध्ये अमेरिकेपाठोपाठ भारत दुस-या स्थानावर आहे.
धुम्रपानासंबंधी आरोग्य मंत्रालयाने संसदेत दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१४-१५ मध्ये ९३.२ अब्ज सिगारेटची विक्री झाली. २०१२-१३ च्या तुलनेत सिगारेट विक्रीमध्ये १० अब्जने घट झाली आहे. २०१४-१५ मध्ये सिगारेटच्या उत्पादनातही ११७ अब्जवरुन १०५.३ अब्जपर्यंत घसरण झाली आहे.
भारतात धुम्रपान करणा-यांचे प्रमाण कमी होत आहे ही समाधानाची बाब असली तरी, दुसरी गंभीर बाब म्हणजे भारतात महिला धुम्रपानाची संख्या वाढली आहे. १९८० मध्ये भारतात धुम्रपान करणा-या महिलांचे प्रमाण ५३ लाख होते. २०१२ मध्ये हेच प्रमाण १ कोटी २७ लाख झाले आहे. जागतिक तंबाखू सेवनाच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.