मृत्यूच्या दाढेतून परतल्या परिचारिका

By admin | Published: July 6, 2014 02:32 AM2014-07-06T02:32:59+5:302014-07-06T02:32:59+5:30

46 भारतीय परिचारिका आज शनिवारी एअर इंडियाच्या एका विमानाने कोची येथील आपल्या घरी पोहोचल्या़ मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याचा आनंद या सर्वाच्या चेह:यावर झळकत होता़

Nurse Surveillance | मृत्यूच्या दाढेतून परतल्या परिचारिका

मृत्यूच्या दाढेतून परतल्या परिचारिका

Next
कोची : इस्लामिक स्टेट फॉर इराक अॅण्ड सीरिया (आयएसआयएस) या इराकी बंडखोरांच्या तावडीतून सुखरूप 
सोडवण्यात आलेल्या 46 भारतीय परिचारिका आज शनिवारी एअर इंडियाच्या एका विमानाने कोची येथील आपल्या घरी पोहोचल्या़ मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्याचा आनंद या सर्वाच्या चेह:यावर झळकत होता़ केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी स्वत: या परिचारिकांच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होत़े या परिचारिकांसोबत अन्य 137 भारतीयांनाही इराकमधून माघारी आणण्यात आले आह़े एअर इंडियाचे विमान सकाळी 11 वाजून 57 मिनिटाला कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल़े इराकमधून परतलेल्या भारतीय परिचारिकांचे या वेळी जोरदार स्वागत झाल़े यापैकी 44 केरळच्या तर दोन तामिळनाडूच्या आहेत़ 
त्यांच्या कुटुंबातील सदस्य, भाजपा व काँग्रेसचे स्थानिक नेते या वेळी विमानतळावर हजर होत़े या परिचारिकांना गुरुवारी सुन्नी दहशतवादी संघटना आयएसआयएसने ताब्यात घेतले होते. तिकरीत येथे सरकारी फौजा व दहशतवादी यांच्यात तुंबळ संघर्ष होत असताना त्यांना रुग्णालयाच्या तळघरातून अज्ञात ठिकाणी हलविण्यात आले होते. भारताने इराकी अधिका:यांच्या प्रयत्नांनी या सर्वाची सुखरूप सुटका केली होती़ इराकमध्ये संघर्ष सुरू होण्यापूर्वी 1क् हजार भारतीय होते, सुन्नी दहशतवाद्यांनी इराकमधील तिकरीत व मोसूल ही दोन महत्त्वाची शहरे ताब्यात घेतली असून, इराक व सिरियातील जिंकलेल्या प्रदेशात इस्लामी राज्याची स्थापना केली आहे. 
  परिचारिकांशिवाय या विमानात 137 अन्य भारतीयांनाही इराकमधून मायदेशी आणण्यात आल़े यात इराकच्या किरकुकमधून 7क्, चालक दलाच्या 23 व तीन सरकारी अधिका:यांचा समावेश आह़े सरकारी अधिका:यांमध्ये एक संयुक्त सचिव स्तराचा परराष्ट्र सेवेतील अधिकारी आणि एक केरळ आयएएस महिला अधिकारी आह़े केंद्र सरकारने केरळची चिंता गंभीरपणो घेत, परिचारिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केल़े परराष्ट्र मंत्रलय आणि भारतीय दूतावासाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली़ याबाबत केरळ सरकार मोदी सरकारचे आभारी आहे, असे केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांनी सांगितले.
 
च्युद्धाने जजर्र झालेल्या इराकमध्ये सुमारे महिनाभर जीव मुठीत घेऊन जगल्यानंतर मायदेशी परतलेल्या परिचारिकांपैकी बहुतेक जणी आता पुन्हा तेथे जायला इच्छुक नाहीत़ 45 अन्य परिचारिकांसोबत आज शनिवारी कोची विमानतळावर पोहोचलेली सैंड्रा सेबेश्यिन आणि तिच्या सारख्याच अनेक जणींनी पुन्हा इराकमध्ये जाणो नाही, असे स्पष्टपणो सांगून टाकले आह़े
 
च्मूळची कोट्टायम येथील सैंड्राने इराकमधील थरारक अनुभव कथन केला़ 
सैंड्रा गतवर्षी 16 ऑगस्टला इराकमध्ये गेली होती़ तिला आणि अनेक परिचारिकांना गव्हर्नमेंट तिकरीत ट्रेनिंग हॉस्पिटलमधून गत चार महिन्यांचे वेतन मिळाले नव्हत़े ती सांगते, आधी आमची 23 जणींची बॅच होती़ यावर्षी फेब्रुवारीत आणखी 15 परिचारिका आमच्या बॅचमध्ये आल़े 3 जुलैला बंडखोरांनी आम्हाला सामान बांधण्यासाठी केवळ 15 मिनिटे दिली़ तुम्ही सर्व आमच्या बहिणीसारख्या आहात, असे त्यांनी आम्हाला सांगितल़े मात्र आम्हाला त्यांच्यावर विश्वास नव्हता़ 
 
च्एर्नाकुलमचे एलानजी बालकृष्णन यांनी सांगितले की, माझी मुलगी रेणू गतवर्षी ऑगस्टमध्ये इराकमध्ये गेली होती़ मुलीला इराकमध्ये पाठविण्यासाठी मला माझी जमीन व घर गहाण ठेवावे लागले होत़े 
 
कन्नूरची सुनी मोल चाको हिने सांगितले, की त्यांना दहशतवादी म्हणता येणार नाही़ ते स्थानिक सरकारचाच एक भाग होत़े इराकमधून परतलेल्या या परिचारिकांना घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक विमानतळावर पोहोचले होत़े सर्वाचेच डोळे पाणावले होत़े

 

Web Title: Nurse Surveillance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.