भारतात उद्योगांसाठी पोषक स्थिती, जागतिक क्रमवारीत देशाचे मानांकन सुधारले

By admin | Published: October 28, 2015 12:40 PM2015-10-28T12:40:33+5:302015-10-28T12:56:07+5:30

'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' च्या जागतिक क्रमावारीत भारताचे मानांकन सुधारले असून भारतात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचेजागतिक बँकेने म्हटले आहे.

Nutrient status for India, improved country's ranking in world rankings | भारतात उद्योगांसाठी पोषक स्थिती, जागतिक क्रमवारीत देशाचे मानांकन सुधारले

भारतात उद्योगांसाठी पोषक स्थिती, जागतिक क्रमवारीत देशाचे मानांकन सुधारले

Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २८ - जगभरातील उद्योजकांना 'मेक इन इंडियाचे' आव्हान करणा-या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर देशात विरोधकांकडून टीका होत असली तरी भारतात उद्योग सुरू करण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे. 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' च्या जागतिक क्रमावारीत भारताचे मानांकन सुधारून १२ स्थानांनी वर गेले असून एकूण १८९ देशांच्या यादीत आता भारत १३० व्या क्रमांकावर पोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत १२ स्थाने वर सरकला आहे. 
जागतिक बॅंकेकडून 'डूईंग बिझनेस २०१६’ हा वार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात सिंगापूर अव्ल स्थानावर आहे. सिंगापूरमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी अत्यंत पोषक स्थिती आहे. यादीत दुस-या क्रमांकावर न्यूझिलंड, तिस-या स्थानावर डेन्मार्क असून त्यापाठोपाठ दक्षिण कोरिआ, हाँगकाँग, ब्रिटन आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. 
भारताच्या मानांकनात इतक्या अल्पावधीत झालेली सुधारणा  ही अत्यंत मोठी घटना असून, कौतुकास्पद कामगिरी आहे, असे मत  जागतिक बॅंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष कौशिक बसू यांनी व्यक्त केले.  देश योग्य दिशेने वाटचाल करीत आहे, हेही सुद्धा यातून स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले.
 

 

Web Title: Nutrient status for India, improved country's ranking in world rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.