नॉयलॉन, सिंथेटिक मांज्यावर बंदी
By admin | Published: July 12, 2017 12:30 AM2017-07-12T00:30:50+5:302017-07-12T00:30:50+5:30
कृत्रिम साहित्य वापरून बनवलेल्या व जैविक विघटन न होणाऱ्या चिनी मांज्यावर राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) मंगळवारी तात्काळ बंदी घातली.
Next
नवी दिल्ली : नायलॉन किंवा कृत्रिम साहित्य वापरून बनवलेल्या व जैविक विघटन न होणाऱ्या चिनी मांज्यावर राष्ट्रीय हरीत लवादाने (एनजीटी) मंगळवारी तात्काळ बंदी घातली.
या मांज्याने जीविताला व पर्यावरणाला धोका निर्माण केल्याचे या बंदीमागे कारण आहे. एनजीटीने सगळ््या राज्य सरकारांना दिलेल्या आदेशात सिंथेटिक मांजा किंवा नायलॉनच्या दोऱ्याची निर्मिती, विक्री, त्याची साठवणूक, खरेदी आणि वापरावर तात्काळ बंदी घालण्यास सांगितले आहे.