भारताचे निमंत्रण ओबामांनी स्वीकारले
By admin | Published: November 21, 2014 08:46 PM2014-11-21T20:46:37+5:302014-11-21T20:46:37+5:30
भारतीय प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वीकारले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - भारतीय प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वीकारले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबामा यांना प्रजासत्ताकदिनी उपस्थित राहावे असे निमंत्रण पाठविले होते. २६ जानेवारी २०१५ रोजीच्या भारतीय प्रजासत्ताकदिनी अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष पहिल्यांदाच उपस्थित राहणार असल्याने या सोहळयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिका दौरा केला आहे. भारत-अमेरिका या दोन्ही राष्ट्रात मैत्रिचे संबंध दृढ होत असताना आता ओबामा हे प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणार असल्याने जागतिक राजकारणात भारताची ताकद आणखीनच अधोरेखित होणार आहे.