ओबामा प्रभावाने पाकचे चिनी अध्यक्षांना लष्करी परेडचे आमंत्रण

By admin | Published: February 4, 2015 03:02 AM2015-02-04T03:02:09+5:302015-02-04T03:02:09+5:30

भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा येऊन गेल्यानंतर पाकिस्तानची पोटदुखी उसळली आहे.

Obama's invitation to military chief to Chinese President | ओबामा प्रभावाने पाकचे चिनी अध्यक्षांना लष्करी परेडचे आमंत्रण

ओबामा प्रभावाने पाकचे चिनी अध्यक्षांना लष्करी परेडचे आमंत्रण

Next

२३ मार्चला कार्यक्रम : सात वर्षांनंतर होणार लष्करी संचलन
इस्लामाबाद : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा येऊन गेल्यानंतर पाकिस्तानची पोटदुखी उसळली आहे. पाकने आपल्या राष्ट्रीय दिनाचा कार्यक्रम ठरविला असून, त्याअंतर्गत सात वर्षांच्या खंडांनंतर होणाऱ्या लष्करी संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना निमंत्रित केले आहे. २३ मार्च रोजी पाकिस्तानमध्ये हा कार्यक्रम होत आहे.
हा कार्यक्रम कोठे आयोजित केला जाईल हे अद्याप निश्चित नाही; पण इस्लामाबाद शहराजवळच कोठेतरी त्याचे आयोजन केले जाईल असे पाकच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले, तसेच जिनपिंग यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे किंवा नाही हेही स्पष्ट झालेले नाही.
पाकिस्तानी लष्करातील तिन्ही दलांचे संचलन गेल्या सात वर्षांपूर्वी बंद करण्यात आले होते. देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
पाकिस्तानच्या या लष्करी संचलनात संरक्षण क्षमतेचे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम केले जात असत. याआधी २३ मार्च २००८ रोजी अखेरचे लष्करी संचलन झाले होते. त्यावेळी परवेझ मुशर्रफ अध्यक्षपदी होते.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा लष्करी संचलन सुरू करण्याची घोषणा केली आहे? ओबामा यांच्या भारत भेटीमुळे आशिया-पॅसिफिक भागात चीन विरोधात नवी आघाडी उभी राहील असे चीनला वाटत असून, त्यामुळे चीनमध्ये विरोधाचे वातावरण होते.
या आठवड्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा चीन दौरा चीनला चुचकारण्यासाठी होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीही २६ मे च्या आधी म्हणजेच पंतप्रधानपदी येऊन वर्ष पूर्ण करण्याआधी चीनला भेट देणार आहेत. (वृत्तसंस्था)

पाकविरोधी प्रस्तावाला चीन व रशियाचा पाठिंबा
च्बीजिंग : दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्रात भारताकडून मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाला चीन व रशियाने पाठिंबा दिला असून, हा ठराव पाकिस्तानच्या विरोधात असल्याने पाकला हा जबर धक्का मानला जात आहे.
च्पाकिस्तानकडून भारतावर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी होणाऱ्या अतिरेक्यांना आश्रय दिला जातो. त्यामुळे दहशतवादाला आश्रय देणाऱ्या, तसेच मदत करणाऱ्या देशांविरोधात संयुक्त राष्ट्रात ठराव मांडण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
च्सोमवारी भारताच्या या भूमिकेला चीन व रशिया यांनीही पाठिंबा जाहीर केला. हे फार मोठे यश असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. चीन व रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या.
च्चीनने पाकविरोधी भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताला आपल्या दृष्टीने महत्त्व असल्याचे दाखविणे, तसेच स्वत: चीनलाही दहशतवादाचा त्रास होत असल्याची कबुली देणे, असे या भूमिकेमागील कारण असावे असे मानले जाते.

Web Title: Obama's invitation to military chief to Chinese President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.