भारत दौ-यामुळे ओबामांचे आयुष्य ६ तासांनी घटले
By admin | Published: January 28, 2015 10:47 AM2015-01-28T10:47:43+5:302015-01-28T10:50:38+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसांच्या भारत दौ-यामुळे त्यांचे आयुष्य सहा तासांनी घटल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी काढला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसांच्या भारत दौ-यामुळे त्यांचे आयुष्य सहा तासांनी घटल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी काढला आहे. दिल्लीतील प्रदुषणाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
दिल्लीचा जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत समावेश होतो. दिल्लीतील वायूप्रदुषणाच्या आधारे अमेरिकेतील एका ख्यातनाम वृत्तवाहिनीने ओबामा यांच्या आरोग्यावर झालेले परिणाम यावर वृत्त दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१३ मधील अहवालानुसार दिल्लीतील हवेत टॉक्सिकचे प्रमाण सर्वात जास्त असते. यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, ह्रदविकार आणि अन्य आजार बळावतात असे अहवालात म्हटले आहे. संबंधीत वृत्तवाहिनीने या अहवालाच्या आधारेच ओबामा यांचे आयुष्य सहा तासांनी घटल्याचे म्हटले आहे.