ओबीसी आरक्षण; आता १४ मार्चला होणार सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 07:58 AM2023-02-11T07:58:01+5:302023-02-11T07:58:38+5:30
काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी या याचिकेवर सुनावणी करण्याची तारीख लवकरच दिली जाईल, असे निर्देश दिले होते.
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर येत्या १४ मार्चला सुनावणी होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली न निघाल्याने राज्यातील या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी या याचिकेवर सुनावणी करण्याची तारीख लवकरच दिली जाईल, असे निर्देश दिले होते. या संदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर १४ मार्चला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.