शांततेचा दावा करणारे दहशतवाद्यांना आश्रय देत नाहीत, भारताने UN मध्ये पाकिस्तानला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 11:48 AM2022-09-24T11:48:11+5:302022-09-24T11:53:00+5:30
संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आरोप केले, या आरोपांना प्रत्युत्तर देताना भारताने पाकिसातनवर टीका केली.
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. महासभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आरोप केले, या आरोपांना प्रत्युत्तर देताना संयुक्त राष्ट्रमध्ये भारत प्रथम मिशनचे मिजिटो विनिटो यांनी युएनजीए मध्ये भारताच्या उत्तराच्या अधिकाराचा वापर करत पाकिस्तानवर टीका केली.
... तर अख्ख्या जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करू; रशियाची भारतातून उघड धमकी
'या बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले हे खेदजनक आहे. आपल्या देशातील गैरकृत्ये लपवण्यासाठी आणि भारताविरुद्धच्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी त्यांनी हे केले आहे, असं मिजिटो विनिटो म्हणाले.
''एक देश जर शांततेचा दावा करत असेल तर, तो देश कधीही कधीही दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही आणि मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांनाही आश्रय देणार नाही. एकाबाजूला शांततेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे दहशतवाद पसरवणे हे तुमचे काम आहे, अशी टीका मिजिटो विनिटो यांनी केली.
'' भारतावर खोटे आरोप करण्यापूर्वी आपल्या देशातील पाहिले. जम्मू-काश्मिरवर दावा करण्यापेक्षा दहशतवाद थांबवावा, असंही विनिटो म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावर सुरू असलेल्या अत्याचाराची आठवण करुन दिली.
A polity that claims it seeks peace with its neighbours would never sponsor cross-border terrorism, nor shelter planners of horrific Mumbai terrorist attack: Mijito Vinito, First Secy, India Mission to UN exercises India's right of reply at #UNGApic.twitter.com/Zu4cG1aKKT
— ANI (@ANI) September 24, 2022
काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शांततेवर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, पाकिस्तानला भारतासह आपल्या शेजारी देशांसोबत शांतता हवी आहे. पण काश्मिर प्रश्नावर हे सर्व अवलंबून आहे, असंही ते म्हणाले होते.