महाराष्ट्र बँकेचे ७ कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पत्रपरिषद : क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप मोंढे यांची माहिती
By admin | Published: September 16, 2015 11:37 PM2015-09-16T23:37:36+5:302015-09-17T00:31:02+5:30
लातूर : बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्या ८१ व्या व्यवस्थापन दिनाच्या निमित्ताने बँकेच्या वतीने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा एक भाग म्हणून लातूर झोन अंतर्गत २५०० ग्राहकांना ७०० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप मोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
लातूर : बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्या ८१ व्या व्यवस्थापन दिनाच्या निमित्ताने बँकेच्या वतीने प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा एक भाग म्हणून लातूर झोन अंतर्गत २५०० ग्राहकांना ७०० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप मोंढे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
बँक ऑफ महाराष्ट्रचा १६ सप्टेंबर स्थापना दिवस असल्याने बँकेच्या वाटचालीला ८१ वर्षे पूर्ण झाली असून, या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत पुणे येथील केंद्रीय कार्यालयात मुद्रा कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व बँकांच्या कार्यक्षेत्रात ग्राहक सभा व विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मुद्रा योजना ही तीन भागांत विभागली असून, शिशु, किशोर आणि तरुण अशी याची विभागणी केली आहे. ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वित्तीय समावेशाची ही पुढची पायरी आहे. शिशु योजनेअंतर्गत छोट्या व्यावसायिकांना ५० हजारपर्यंतचे कॅश क्रेडिट व मुदत कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर किशोर मुद्रा योजनेनुसार ५ लाख रुपयांपर्यंतचे मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरुण मुद्रा योजनेअंतर्गत १० लाख कॅश क्रेडिट व मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंतप्रधान यांच्या जन-धन योजनेचा पुढचा टप्पा म्हणून या योजनेकडे बघण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना मुद्रा कार्ड दिले जाणार असून, त्यांच्या कर्जाचा व्याज दर हा बेस रेट एवढा असणार आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना सदरील कर्जासाठी कोणतेही तारण द्यावे लागणार नाही. हे सर्व कर्ज विना तारण दिले जाणार आहे. १६ ते २५ सप्टेंबरपर्यंत मुद्रा लाभार्थींचे सर्व्हेक्षण करून त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २५ सप्टेंबरनंतर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आलेल्या अर्जातील लाभार्थ्यांना कर्ज वितरीत केले जाणार आहे. यावेळी पत्रपरिषदेस उपक्षेत्रीय व्यवस्थापक उदय कुर्वलकर यांची उपस्थिती होती.
२५०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट...
बँक ऑफ महाराष्ट्रच्या लातूर झोन अंतर्गत पाच जिल्ांतील २५०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, २५०० लाभार्थ्यांना ७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जाणार आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय व्यवस्थापक दिलीप मोंढे यांनी केले आहे.