विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकवणं बंधनकारक

By admin | Published: February 18, 2016 06:34 PM2016-02-18T18:34:45+5:302016-02-18T18:56:53+5:30

एकीकडे दिल्लीतील जवाहलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशाविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे देशात एक वेगऴेच वातावरण निर्माण झाले असता, आता केंद्र

Obligations to Tricolor at Universities | विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकवणं बंधनकारक

विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकवणं बंधनकारक

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८- एकीकडे दिल्लीतील जवाहलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देशाविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे देशात एक वेगऴेच वातावरण निर्माण झाले असता, आता केंद्र सरकारने देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा लावण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, या आदेशाची सुरुवात दिल्लीतील जवाहलाल नेहरु विद्यापीठातून करावी असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे देशातील वातावरण आणखीन बिघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत गुरुवारी देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये  तिरंगा फडकावणं बंधनकारक करण्याचे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये तिरंग्यासाठी २०७ फूट उंच खांब आणि १२५ किलो वजनाचा तिरंगा असावा, असेही  नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Obligations to Tricolor at Universities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.