पाकिस्तानात ईदच्या दिवशी देखील लाइट न मिळाल्याने नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 06:53 PM2019-08-15T18:53:36+5:302019-08-15T18:53:44+5:30

पाकिस्तानात अनेक दिवसांपासून तेथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

On the occasion of Eid in Pakistan, there is no light for the citizens | पाकिस्तानात ईदच्या दिवशी देखील लाइट न मिळाल्याने नागरिकांचा संताप

पाकिस्तानात ईदच्या दिवशी देखील लाइट न मिळाल्याने नागरिकांचा संताप

Next

नवी दिल्ली: पाकिस्तानात अनेक दिवसांपासून तेथील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच ईद सणाच्या दिवशी देखील खॅबर पख्तूनख्वा गावात लाइट न मिळाल्याने लोकांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले.

द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, अनेक दिवसांपासून खॅबर पख्तूनख्वा गावात लाइट नाही आणि आलीच तर तिचा वोल्ट कमी असतो. तसेच ईदच्या दिवशी तरी लाइट देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते आश्वाशन पूर्ण न केल्याने जिल्ह्यातून जाणारा मुख्य रस्त्यावर टायर जाळण्यात आले आणि तब्बल तीन तास रस्ता रोखून ठेवला होता. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी रॅली काढून नाराजी व्यक्त केली होती. राजकीय पक्षांनी विविध जिल्यह्यातील  मस्जिदच्या लाउडस्पीकरच्या माध्यमाने लोकांना या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याची विनंती केली.

पाकिस्तान आधीच महागाई डबघाईला गेली होती. त्यातच भारताने जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याने भारतासोबत व्यापार देखील बंद केला. त्यामुळे ही महागाई आणखी वाढल्याने तेथील प्रत्येकाच्याच घराचं बजेट कोलमडलं आहे. दूध, भाजीपाला, मांसाहारी पदार्थांसाठी वाढीव पैसे मोजावे लागल्याने घराचं स्वयंपाकघर कसं चालवायचा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
 

Web Title: On the occasion of Eid in Pakistan, there is no light for the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.