बस चालवताना चालकाला हार्ट अटॅक पण सोडलं नाही स्टेअरिंग; वाचवला 48 प्रवाशांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 11:24 IST2023-10-29T11:24:19+5:302023-10-29T11:24:54+5:30
बस चालक प्रवाशांना घेऊन ठरलेल्या ठिकाणी जात होता आणि त्याचवेळी त्याला हार्ट अटॅक आला.

बस चालवताना चालकाला हार्ट अटॅक पण सोडलं नाही स्टेअरिंग; वाचवला 48 प्रवाशांचा जीव
ओडिशातील एका बस चालकाने प्रसंगावधानाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. बस चालक प्रवाशांना घेऊन ठरलेल्या ठिकाणी जात होता आणि त्याचवेळी त्याला हार्ट अटॅक आला. छातीत दुखत असल्याचं जाणवताच बस चालकाला हार्ट अटॅक आल्याचं समजलं आणि त्याने लगेच बस भिंतीवर आदळली. यामुळे बसमधील 48 प्रवाशांचा जीव वाचला आहे.
48 प्रवाशांचा वाचला जीव
पोलिसांनी सांगितले की, ही बस भुवनेश्वरला जात होती आणि त्यात 48 प्रवासी होते. बस चालकाला अचानक हार्ट अटॅक आल्याने त्याने बस एका भिंतीवर आदळली, त्यामुळे त्याला बस योग्य वेळी थांबवता आली.
बस चालवताना हार्ट अटॅक
शुक्रवारी रात्री कंधमाल जिल्ह्यातील पाबुरिया गावाजवळ ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. ते म्हणाले की, सना प्रधान नावाच्या बसच्या चालकाला गाडी चालवताना छातीत दुखू लागले आणि स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. टिकाब३ली पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक कल्याणमयी सेंधा म्हणाले, 'त्याला समजलं की तो पुढे गाडी चालवू शकणार नाही. त्यामुळे त्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळलं, त्यानंतर ते थांबलं आणि प्रवाशांचा प्राण वाचू शकला.'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मां लक्ष्मी' ही खासगी बस साधारणत: दररोज रात्री कंधमालमधील सारंगड येथून जी उदयगिरी मार्गे राज्याची राजधानी भुवनेश्वरला जाते. या घटनेनंतर बस चालकाला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र हार्ट अटॅक आल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काही वेळाने प्रवाशांसह बस आपल्या गंतव्यस्थानी रवाना झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.