कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात चूक कुणाची, कारण काय? धक्कादायक माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:56 AM2023-07-04T11:56:43+5:302023-07-04T11:58:49+5:30

Coromandel Express Train accident: कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात का झाला आणि त्यामध्ये चूक कुणाची होती, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रेल्वे अपघाताच्या चौकशीमधून अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत.

Odisha Coromandel Express Accident: Who is at fault in the Coromandel Express accident, what is the reason? In front of shocking information | कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात चूक कुणाची, कारण काय? धक्कादायक माहिती समोर 

कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात चूक कुणाची, कारण काय? धक्कादायक माहिती समोर 

googlenewsNext

गेल्या महिन्यात २ जून रोजी ओडिशामधील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसला झालेल्या भीषण अपघातात २९२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर एक हजारांहून अधिक प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताच्या कारणाबाबत अनेक दावे केले जात होते. दरम्यान, हा भीषण अपघात का झाला आणि त्यामध्ये चूक कुणाची होती, याबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रेल्वे अपघाताच्या चौकशीमधून अनेक त्रुटी उघड झाल्या असून, थेटपणे स्टेशन मास्तरांची चूक समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालामध्ये अपघातामागची कारणं सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहेत.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या या अहवालामध्ये बाहानगा बाजार रेल्वे स्टेशनवरील स्टेशन मास्तरांनी कर्मचाऱ्यांना दोन समांतर रेल्वे रुळांना जोडणारे स्विच सदोष असल्याची कल्पना दिली असती, तर हा अपघात टाळता आला असता. त्या दिवशी कोरोमंडल एक्स्प्रेस चुकून लूपलाईनवर जाऊन मालगाडीवर आदळली होती. या रिपोर्टमध्ये सिग्नल फेल होणं आणि टेलिकॉम डिपार्टमेंटच्या अनेक दोषांवर बोट ठेवण्यात आलं आहे. हा अहवाल रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाकडे सोपवला आहे. 

सिग्नलिंगमध्ये दोष असले तरी क्रॉसओव्हर १७ A/B वर झालेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील गडबडीचा शोध घेता आला असता. क्रॉसओव्हर १७ A/B  या पॉईंटवरून कोरोमंडल एक्स्रपेस चेन्नईला न जाता लूपलाईनवर गेली. त्यानंतर ती एका मालगाडीवर धडकून भीषण अपघात झाला.

स्टेटस बदलण्यासाठी स्टेशन मास्तर एस.बी. मोहंती यांनी सिग्नल स्विच ऑन केल्यानंतर, असं होण्यास १४ सेकंद लागणे अपेक्षित होते. मात्र सिग्नल लगेच बदलला. ही बाब अनपेक्षित होती. या रिपोर्टनुसार सिग्नलमध्ये अचानक झालेला बदल हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमममधील त्रुटी होती. कारण ट्रॅकची ग्राऊंड पोझिशन त्वरित बदलत नाही, याकडे स्टेशन मास्तरांनी लक्ष देणे आवश्यक होते.

तसेच बाहानगा बाजार बाजार रेल्वे स्टेशनवर लेव्हल क्रॉसिंग गेट ९४ वर इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरियरला बदलण्यासाठी सर्किट डायग्रॅम न देणं हे एक चुकीचं पाऊल होतं. त्यामुले चुकीच्या पद्धतीनं वायरिंग झाली. फिल्ड पर्यवेक्षकांच्या एका टिमने वायरिंग डायग्रॅममध्ये बदल केला. मात्र त्याची पुनरावृत्ती करण्यात त्यांना अपयश आलं. चुकीचं वायरिंग आणि केबल सदोष असल्याने १६ मे २०२२ रोजी दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडकपूर डिव्हिजनच्या बंकरनयाबाज स्टेशनवर अशीच घटना घडली होती. जर आधीच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं असतं तर हा रेल्वे अपघात टाळता आला असता, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

Web Title: Odisha Coromandel Express Accident: Who is at fault in the Coromandel Express accident, what is the reason? In front of shocking information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.