Odisha Naba Das Firing:आरोग्यमंत्र्यांवर गोळ्या का झाडल्या? आरोपीची पत्नी म्हणाली, व्हिडिओ कॉल केला, पती 7-8 वर्षांपासून.....;
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 17:51 IST2023-01-29T17:51:04+5:302023-01-29T17:51:15+5:30
ओडिशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओडिसाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने हल्ला केला आहे.

Odisha Naba Das Firing:आरोग्यमंत्र्यांवर गोळ्या का झाडल्या? आरोपीची पत्नी म्हणाली, व्हिडिओ कॉल केला, पती 7-8 वर्षांपासून.....;
ओडिशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओडिसाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने हल्ला केला आहे. एएसआय गोपाल दास असं या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याने मंत्र्यांवर का गोळीबार केला याचे कारण अजुनही समोर आलेले नाही. पोलीस आरोपी एएसआय गोपाल दास याची चौकशी करत आहेत. दरम्यान, एएसआयच्या पत्नीने या प्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे.
ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांवर बंदोबस्तावरील एएसआयचा गोळीबार; गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
आरोपी एएसआय गोपाल दासची पत्नी जयंती दास यांना पती संदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. या घटने संदर्भात मला काहीच माहित नाही, सकाळपासून त्यांच्याशी माझे बोलनेही झालेले नाही. आरोपीने सकाळी आपल्या मुलीला व्हिडिओ कॉल केला होता. थोडा वेळ बोलल्यानंतर दुसरा कॉल येत असल्याचे सांगून कॉल डिस्कनेक्ट झाला. त्यानंतर ते बाहेर गेले, असं आरोपीची पत्नी जयंत दास यांनी म्हटले आहे.
'गोपाल अगोदर बरा होता, पण काही दिवसापासून त्याची मनस्थिती ठिक नव्हती. यासाठी औषध घेत होता. तो ७/८ वर्षांपासून औषध घेत होता. त्याला आता सगळं नॉर्मल होतं, असं पत्नीने सांगितले. यावरुन आरोपीची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे समोर आले आहे.
आरोग्य मंत्री नाबा दास गांधी चौकात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कारमधून उतरत असताना आरोपी एएसआयने गोळीबार केला. छातीच्या डाव्या बाजूला गोळ्या लागल्या. एएसआयच्या रिव्हॉल्व्हरमधून काही गोळ्या लागल्याने शेजारी उभा असलेला आणखी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
"घटनेनंतर दास यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंत्र्याला पुढील उपचारासाठी भुवनेश्वरला नेण्यात येत आहे. या महिन्यात त्रिवेणी अमावस्येला महाराष्ट्राच्या शनी सिंगणापूर मंदिरात 1 कोटींपेक्षा जास्त किमतीचे 1.7 किलो सोने आणि 5 किलो चांदीचे भांडे दान केल्याच्या वृत्तामुळे तीन वेळा आमदार असलेले हे अलीकडेच चर्चेत आले होते.