भयंकर! जादुटोण्याच्या संशयातून काकीची हत्या; शिर हातात घेऊन 'तो' 13 किमी चालला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 01:13 PM2020-06-16T13:13:00+5:302020-06-16T13:24:34+5:30
तरुणाने काकी जादूटोणा करते असा संशय आल्याने काकीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे काकीचं शिर हातात घेऊन तो तब्बल 13 किलोमीटर पायी चालत पोलीस ठाण्यात पोहोचला.
भुवनेश्वर - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. एका 30 वर्षीय तरुणाने काकी जादूटोणा करते असा संशय आल्याने काकीची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे काकीचं शिर हातात घेऊन तो तब्बल 13 किलोमीटर पायी चालत पोलीस ठाण्यात पोहोचला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधूराम सिंह असं आरोपीचं नाव आहे. मयूरभंज जिल्ह्यातील नौशी गावात ही भयंकर घटना घडली आहे. जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून बुधूरामने आपल्या काकीची निर्घृण हत्या केली. त्यानंतर 13 किलोमीटरवर असलेल्या खुंटा पोलीस ठाण्यात गेला. बुधूरामच्या मुलीचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. काकी चंपा सिंह हिने काळी जादू केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा संशय त्याला आला होता. त्यामुळेच संतापाच्या भरात त्याने काकीची हत्या केली.
Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!https://t.co/h3PUQ5HXiN#FuelPriceHike#FuelPrices#PetrolPrice#Diesel#Petrol
— Lokmat (@MiLOKMAT) June 16, 2020
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंपा सिंह आपल्या घरातील हॉलमध्ये झोपल्या होत्या. बुधूरामने त्याचवेळी कुऱ्हाडीने तिच्यावर वार करत तिची हत्या केली. तिचं शिर धडापासून वेगळं केलं. ते हातात घेऊन तो पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने हत्या केल्याचं सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी बुधूरामला अटक केली आहे. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
'सामनातून काँग्रेस-राष्ट्रवादीची लाज काढली?, काँग्रेस-राष्ट्रवादीत स्वाभिमान शिल्लक आहे का?' https://t.co/bSZ7elfh8S#coronainmaharashtra#Shivsena#BJP#Congress#NCP
— Lokmat (@MiLOKMAT) June 16, 2020
राहुल गांधींनी केलेल्या 'त्या' व्हायरल ट्विटमागचं जाणून घ्या सत्यhttps://t.co/kpRMmOvMhV#SushantSinghRajput#RahulGandhi#Congress
— Lokmat (@MiLOKMAT) June 16, 2020
महत्त्वाच्या बातम्या
"सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर आधी पेशंटच्या खाटेचं बघा"
Sushant Singh Rajput Suicide: सुशांतच्या आत्महत्येनंतर राहुल गांधींचं 'ते' ट्विट व्हायरल; पण...
Fuel Price: महागाईचा चटका! इंधन दरवाढीचा भडका उडणार, दोन आठवडे रोज पेट्रोल-डिझेल महागणार
CoronaVirus News : सलाम! 'या' डॉक्टरांनी जिंकलं सर्वांचं मन; पीपीई सूटवरील फोटोमागे 'हे' आहे कारण