Odisha Train Accident : 'आमची जबाबदारी अजून संपलेली नाही...; ओडिशा रेल्वे अपघातावर बोलताच मंत्री अश्विनी वैष्णव भावूक झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 08:56 AM2023-06-05T08:56:05+5:302023-06-05T09:08:13+5:30

अपघातग्रस्त कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन मुख्य मार्गाऐवजी बहंगा बाजार स्थानकाच्या आधी 'लूप लाइन' वर गेली आणि तेथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली, असं तपासात समोर आले आहे.

odisha train accident ashwini vaishnaw gets emotional our responsibility is not over yet | Odisha Train Accident : 'आमची जबाबदारी अजून संपलेली नाही...; ओडिशा रेल्वे अपघातावर बोलताच मंत्री अश्विनी वैष्णव भावूक झाले

Odisha Train Accident : 'आमची जबाबदारी अजून संपलेली नाही...; ओडिशा रेल्वे अपघातावर बोलताच मंत्री अश्विनी वैष्णव भावूक झाले

googlenewsNext

Odisha Train Accident : बालासोर येथे रेल्वेच्या झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. मालगाडी तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या २८८ वर पोहोचली असून ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील ५६ लोक गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात काल रेल्वेमंत्र्यांनी माहिती दिली.  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ओडिशा रेल्वे अपघातातील बेपत्ता लोक त्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर शोधून काढणे हे त्यांचे ध्येय आहे. आपली जबाबदारी अजून संपलेली नाही. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री भावूक झाले. 

बड्या अधिकाऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच पत्र लिहिलेले; रेल्वे अपघात टळला असता, पण लक्षच दिले नाही

रेल्वेने ओडिशा ट्रेन अपघातात मोटरमनची चूक आणि सिस्टममध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारली आणि 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' सिस्टममध्ये संभाव्य 'तोडफोड' आणि छेडछाड करण्याचे संकेत दिले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अपघाताचे "मूळ कारण" शोधून काढले आहे आणि त्यासाठी जबाबदार "दोषी" शोधले आहेत.

'हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे आणि पॉइंट मशीनमध्ये केलेल्या बदलांमुळे घडला," बालासोर जिल्ह्यातील अपघातस्थळी त्यांनी सांगितले की, छेडछाड होण्याची शक्यता दर्शवत, सिग्नल दिला आणि ट्रेन थांबली" ट्रेन नंबर १२८४१ कोरोमंडल एक्स्प्रेस अप मेन लाईनसाठी रवाना करण्यात आली, पण ट्रेन अप लूप लाईनमध्ये घुसली आणि लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली आणि रुळावरून घसरली. दरम्यान, ट्रेन क्रमांक १२८६४ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाउन मेन लाइनवरून जात असताना तिचे दोन डबे रुळावरून घसरले आणि उलटले.

बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता झालेल्या भीषण अपघातात किमान २८८ लोक ठार आणि ११०० हून अधिक जखमी झाले.

रविवारी अधिकाऱ्यांनी कोरोमंडल एक्स्प्रेसच्या मोटरमनलाही क्लीन चिट दिली. त्यांच्याकडे पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल होता आणि तो रेट केलेल्या वेगापेक्षा जास्त ट्रेन चालवत नव्हता. अपघाताच्या प्राथमिक चौकशी अहवालात असे म्हटले आहे की, कोरोमंडल एक्सप्रेस स्टेशनवरील लूप लाइनमध्ये घुसली ज्यावर लोहखनिजाने भरलेली मालगाडी उभी होती.

Web Title: odisha train accident ashwini vaishnaw gets emotional our responsibility is not over yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.