ओडिशा रेल्वे दुर्घटना : ममतांच्या 'त्या' वक्तव्यावर सुवेंदूंचा पलटवार; म्हणाले, अपघाताला TMC च जबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 11:07 AM2023-06-06T11:07:36+5:302023-06-06T11:08:26+5:30

ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र काहीही झाले नाही.

Odisha train accident balasore bjp leader Suvendu adhikari hits back at Mamata's statement and Said TMC is responsible for the accident | ओडिशा रेल्वे दुर्घटना : ममतांच्या 'त्या' वक्तव्यावर सुवेंदूंचा पलटवार; म्हणाले, अपघाताला TMC च जबाबदार!

ओडिशा रेल्वे दुर्घटना : ममतांच्या 'त्या' वक्तव्यावर सुवेंदूंचा पलटवार; म्हणाले, अपघाताला TMC च जबाबदार!

googlenewsNext

ओडिशा रेल्वेअपघातानंतर, परिस्थिती पुन्हा एकदा पटरीवर आली आहे. मात्र, यासंदर्भात राजकीय पक्षांमध्ये आरोपबॅनर्जीप्रत्यारोप सुरूच आहेत. अपघातानंतर रेल मंत्री अश्विनी वैष्णव यांना निशाणा बनवले जात होते. मात्र आता सीबीआय चौकशीचा मुद्दा समोर आल्यानंतर, विरोधकांनी पुन्हा एकदा विरोधी सूर आळवला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय चौकशीसंदर्भात, याने काहीही साध्य होणार नाही, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपनेही त्यांच्यावर पलटवार केला आहे. पश्चिम बंगालचे विरोध पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या या वक्तव्यावर पलटवार करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

मृतांचा आकडा लपवतेय सरकार बॅनर्जी 
टीएमसी नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत, सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचे म्हटले आहे. ममता म्हणाल्या, 'एका बाजूला मृत्यूंचा पूर आहे आणि लोकांप्रती आपल्या मनात कसल्याही प्रकारची सहानुभूती नाही. सरकारचे लोक जनतेसोबत उभे नाहीत. ते कुठल्याही पद्धतीने मृतांच्या आकड्यांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी या स्पर्धेचा भाग नाही. मी नेहमीच लोकांबरोबर उभी आहे.

सीबीआय चौकशीवर खडा केला सवाल - 
यावेळी ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. मात्र काहीही झाले नाही. सीबीआय गुन्हे विषयक प्रकरणांचा तपास करते. मात्र ही दुर्घटना आहे. रेल्वे संरक्षण आयोग आहे, सर्वप्रथम तेच चौकशी करतात. लोकांसमोर सत्य यावे एवढीच आमची इच्छा आहे. ही वेळ सत्य दाबण्याची नाही. त्या कुटुंबीयांचा विचार करता ज्यांनी आपले लोक गमावले आहेत.'

भाजपचा पलटवार - 
ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावरून भाजपने पलटवार केला आहे. पश्चिम बंगालमधील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, या घटनेमागे टीएमसीच आहे. ते दुसऱ्या राज्यातील सीबीआय चौकशीसंदर्भात एवढे चिंतित आणि घबरलेले का? हे कॉल रिकॉर्डिंग जे टीएमसी नेत्यांनी शेअर केले आहे, ज्यात रेल्वेचे दोन अधिकारी बोलत आहेत, त्याची चौकशी व्हायला हवी. आपण बालासोरमध्ये सीबीआयसंदर्भात एवढे चिंतित का?

Web Title: Odisha train accident balasore bjp leader Suvendu adhikari hits back at Mamata's statement and Said TMC is responsible for the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.